Accident News : "गाढ झोपेतील आदिवासी मजुरांवर काळाचा घाला ; आयशर टिनशेड मध्ये घुसल्याने 4 जागीच ठार,तर 9 मजूर गंभीर

"वडनेर भोलजी जवळ सकाळी 5 वाजेची घटना."
accident
accident sakal
Updated on

नांदुरा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेर भोलजी येथील चांदुरबिस्वा रस्त्यादरम्यान उड्डाणपूलाजवळच्या रत्याच्या नाली कामासाठी नुकत्याच दाखल झालेल्या अमरावती जिल्ह्यातील व परराज्यातील मजुरांच्या शेडमध्ये भरधाव आयशर ट्रक घुसल्याने गाढ झोपेतील 4 मजुरांचा चुराडा झाल्याची घटना दि.2 ऑक्टोबरच्या सकाळी 5 वाजता घडली.या घटनेत 4 आदिवासी मजूर जागीच ठार झाले असून 9 मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे.जखमीना त्वरित उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले असून यात मृत्युंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील व काही परराज्यातील आदिवासी मजूर हे नुकतेच राष्ट्रीय महामार्ग क्र.6 च्या साइड नाली बांधकाम करण्यासाठी वडनेर येथे दाखल झाले असून त्यांनी वास्तव्यासाठी रस्त्या पलीकडे टिनशेड तयार केले आहे.त्या टिनशेड मध्ये एकूण 13 मजूर हे नेहमीप्रमाणे गाढ झोपी गेले असतांना दि.2 चे सकाळी 5 वाजेदरम्यान आयशर क्र.PB 11-CZ 4074 भरधाव वेगाने टिन चिरून शेडमध्ये घुसल्याने 4 मजुरांचा टिन खाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर 9 जण गंभीररित्या जखमी झाले.

accident
Nagpur : ‘डीजे’ चा गोंगाट ; पोलिसांकडील उपकरणे ठरली शोभेची

मृतकांमध्ये प्रकाश मकु धांडेकर 26,पंकज तुळशीराम जांबेकार 19,राजाराम दादू जांबेकार 35,अभिषेक रमेश जांबेकार 18 वर्षे रा. सर्व मोरगड, ता. चिखलदरा, जि. अमरावती तर जखमीमध्ये दीपक पणजी बेलसरे, कमल रमेश जांबेकार,अमर बजू, श्याम भास्कर रा.मोरगड,गुणी भोया भोगर भोया रा. बोरीमोतली तह गढवा,अक्षयकुमार कुमार भैया रा. चिनिया, तह.गढवा,सतपाल कुमार मनीकचंद,महेश मोची, आशिष कुमार निर्मल भुयार रा. बोरी मातोली चा समावेश आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर सह सहकारी ऍम्ब्युलन्स सह दाखल झाले होते.

accident
Vidarbh News : हत्ती लागले परतीच्या प्रवासाला! इटियाडोह धरण परिसरात मुक्त संचार

यातील मृतकांना नांदुरा येथे तर गंभीर जखमीना तात्काळ मलकापूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.या घटनेतील मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता असून खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून घटनेची अधिक माहिती जाणून घेतली असून जिल्हा पोलीस अधिक्षक घटनास्थळाला भेट देणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.