Accident: मलकापूर नजिक विचित्र अपघात! चार जणांचा दुर्दैवी मृत्यू; गर्भवती महिलेचा देखील समावेश

आयशरची प्रथम खासगी बसला व नंतर गर्भवतीला धडक
Accident
Accidentesakal
Updated on

मलकापूर: रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या लक्झरी बसला मागून मालवाहू वाहनाने धडक मारल्याने बस पुढे सरकली व तिने समोरच्या वाहनाच्या चालकाला धडक मारली. त्यात चालक ठार झाला.

तर मालवाहू वाहनाच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका गर्भवती महिलेला धडक मारून रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात कोसळली. त्यामुळे महिलेसह गाडीचा चालक, क्लिनर ठार झाले.

राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरनजीक आज शुक्रवारी (ता. ३० जून) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या विचित्र अपघातात चार जण ठार झालेत.

Accident
विद्यार्थ्यांची ‘पॉलिटेक्निक’ला सर्वाधिक पसंती! प्रवेश क्षमता एक लाख अन्‌ नोंदणी १.४० लाख विद्यार्थ्यांची

प्राप्त माहितीनुसार हंस ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (एमपी०९ एफए ८३५१) राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व्ही.एन.जीन जवळ पंचर झाल्याने रस्त्याच्या मधोमध उभी होती. चाक बदलवण्यासाठी हंस ट्रॅव्हल्सच्या चालकाने मागून येणाऱ्या महिन्द्रा ट्रॅव्हल्सला थांबवले.

ही गाडी हंस ट्रॅव्हल्सच्या बससमोर थांबली व त्याचा चालक राजुभाई ऊर्फ हरीष लल्लुभाई जाधव (वय ४५) हा त्याच्या गाडीतला जॅक हंस ट्रॅव्हल्सच्या चालकाला देत होता. इतक्यात पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू आयशर वाहनाने (एमएच १८ बीजी ०८८१) हंस ट्रॅव्हल्सला मागून धडक दिली.

त्यामुळे हंस ट्रॅव्हल्सची गाडी समोर सरकली व तिने समोर उभ्या असलेल्या महिंद्रा ट्रॅव्हल्सचा चालक राजुभाई याला धडक दिली. यात राजूचा जागीच मृत्यू झाला. मृत राजू गुजरातमधील रहिवासी आहे.

Accident
Vidarbha Travels Burned : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; विदर्भ ट्रॅव्हल्स पेटल्याने 25 जणांचा मृत्यू, 4 मुलांचाही समावेश

हंस ट्रॅव्हल्स बसला धडक दिल्यानंतर आयशरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व आयशर वाहन पुढे जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या अंजली आकाश जाधव - मोहिते या २७ वर्षीय गर्भवती महिलेला धडकले. यात ती गंभीर जखमी झाली. तर आयशरही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली.

त्यात आयशरचा चालक किरण खंडू भदाणे (४२, वर्षे) आणि क्लिनर सीताराम ऊर्फ अप्पा राम बारेला (५५, दोन्ही रा. अमराळे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) या दोघांचाही आयशरमध्ये दबल्याने जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी नदीम खान नईम खान पठाण याने दिलेल्या तक्रारीवरून आयशर व हंस ट्रॅव्हल्स या दोन्ही वाहनाच्या चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू

अपघातात जखमी असलेली गर्भवती महिला अंजली जाधव हिला गंभीर जखमी अवस्थेत प्रारंभी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात व नंतर बुलढाणा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.