Patur Akola: पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस ठाणे हद्दीत घडलेला प्राणघातक हल्ला हा पूर्व-वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे समोर येत आहे. प्राथमिक माहिती नुसार, त्यांनी काही काळापूर्वी स्थानिक पातळीवरील काही लोकांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते, ज्यामुळे या घटनेला वैयक्तिक रागाची किनार लागली आहे.
हल्ला सुयोजित होता आणि त्यामागे एक कट रचला गेला होता, ज्यामध्ये चार ते पाच जणांचा सहभाग होता. हल्लेखोरांनी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास मुर्तळकर यांच्यावर अचानक सशस्त्र हल्ला चढवला.