Akola News: निवडणूक निकालाआधीच अनुप धोत्रे खासदार? अकोल्यात भाजपकडून पोस्टरबाजी

Akola News: निवडणूक निकालाआधीच अनुप धोत्रे खासदार, अकोल्यात भाजपकडून पोस्टरबाजी
Akola Newssakal
Updated on

Akola News: अकोला लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (भाजप) उमेदवार अनुप धोत्रे यांचा निवडणूक निकालाआधीच खासदार म्हणून घोषीत करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. २४ मेरोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी शहरात काही ठिकाणी पोस्टरबाजी करून आपला अतिउत्साहाचे दर्शन घडवले आहे. (Maharashtra News)

अनुप धोत्रे हे खा. संजय धोत्रे यांचे सुपूत्र असून यावेळेस त्यांनी अकोला लोकसभेची निवडणूक लढवली. ४ जूनरोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होत आहे. निकालाची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. (akola News )

Akola News: निवडणूक निकालाआधीच अनुप धोत्रे खासदार, अकोल्यात भाजपकडून पोस्टरबाजी
Akola News : ग्रामीण भागात शेणखताचा भासतोय तुटवडा!

दरम्यान शुक्रवारी, २४ मेरोजी भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अनुप धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खासदार म्हणून संबोधिले आहे. (vidahrbha News)

याआधी सुद्धा एका शासकीय कार्यालयात आयोजित बैठकीला सुद्धा ते उपस्थित झाले होते. अद्याप निकाल बाकी असून भाजप आणि उमेदवाराकडून अशाप्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे दिसते.(marathi News)

राजकीय वर्तुळात याची चांगली चर्चा रंगली आहे. आदर्श आचार संहिता सुरु असताना थेट सार्वजनिकपणे खा.म्हणून भाजप उमेदवाराचा प्रचार आणि शुभेच्छा दिल्या जात आहे. निवडणुक विभाग भाजपचे आक्रमण व हुकूमशाहीने सुस्त पडला आहे. तो फक्त इतरांवर कारवाईसाठी असल्याचे एकंदरीत चित्र आहे.(Anup Dhotre Bjp)

Akola News: निवडणूक निकालाआधीच अनुप धोत्रे खासदार, अकोल्यात भाजपकडून पोस्टरबाजी
Akola Weather Update : उष्म्याने जिवाची लाही-लाही! अकोल्यात सर्वाधिक ४५.५ सेल्सिअस तापमानाची नोंद

एवढी घाई कशासाठी?

अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अनुप धोत्रे, महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात थेट लढत झाली आहे.(prakash ambedkar)

निवडणूकीचा निकाल सुद्धा अनपेक्षीत लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. एक वेळ असे समजू की, अनुप धोत्रे निवडून येतीलही. पण ते भविष्य आहे. त्याआधीच त्यांना खासदार म्हणून मिरवायची घाई कशासाठी? असाप्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

निवडणूक विभाग झोपलाय काय?

आचार संहिता सुरु असताना हा प्रकार होत असून त्याकडे निवडणुक विभागाचे जाणीवपुर्वक दूर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अनुप धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खासदार दाखविण्याची घाई भाजपाच्या नेत्यांना झाली आहे. लोकशाही प्रक्रियेतील निवडणुकीवर या नेत्यांचा विश्वास नसावा किंवा भाजपची हुकूमशाही येथे लोकांवर थोपविण्यासाठी हा उद्योग भाजपने केल्याची चर्चा शहरात आहे.(maharashtra News)

Akola News: निवडणूक निकालाआधीच अनुप धोत्रे खासदार, अकोल्यात भाजपकडून पोस्टरबाजी
Akola News : शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी; कृषी केंद्र संचालकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.