गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : विटांनी बांधलेली घरे आपल्याला शेकडो संख्येने दिसतात.अश्यात एका गावात केवळ दगडांचीच घरे आहेत. पक्की घरे असो वा झोपडी. बाथरूम असो वा जनावरांचा गोठा..! त्यात केवळ दगडेच दिसतील. दगडांचे गाव अशी ओळख असलेलं किरमीरी हे गाव गोंडपिपरी तालुक्यात येतं. स्लॕबचा घराची फॕशन यायचा आधी येथिल दगड पंचक्रोशीत लोकप्रिय होता.
गोंडपिपरी तालुक्यात येणारे किरमीरी हे गाव वर्धा नदी पात्रापासून काही अंतरावर वसलेलं आहे.एकीकडे वर्धा नदी तर दूसरीकडे डोंगर. गावात 350 ते 400 घरे आहेत. लोकसंख्या 1 हजार 300. या गावाचे वैशिष्टय म्हणजे गावातील 95 टक्के घरे दगडांनी बांधलेली आहेत. गावाला लागुनच असलेल्या डोंगरात घिसी गोटा मोठ्या प्रमाणात सापडतो.
जेव्हा स्लॕबच्या घराची फॕशन नव्हती तेव्हा येथिल दगडांना मोठी मागणी होती.गावातील बहूतांश कुटूंब डोंगरातील दगड काढण्याचे काम करायचे.दगड काढणे अन विकणे हाच गावाचा मुख्य व्यवसाय झाला होता.घराचा बांधकामासाठी गोंडपिपरी तालुक्यातील बऱ्याच गावातून ग्राहक येथे गर्दी करायचे.
धाबा परिसरातील बहूतांश जून्या घरांचा पाया किरमीरी येथिल दगडांनीच भरलेला आहे. घर बांधकाम असो वा विहीर. दगड किरमीरीचाच असायचा. त्याप्रमाणेच किरमीरी येथील दगडी पाण्याचे टाके प्रसिद्ध होते. या टाक्याला मोठी मागणी होती. लहान आकाराचा टाक्यापासून ते मोठे टाके येथिल गावकरी बनवायचे. आजही अनेक घरात किरमीरी येथिल दगडी टाके दिसतात. टाके बनविण्यासाठी भला मोठा दगड पोखरून काढावे लागत असे. तयार झालेले टाके बैलबंडीने ग्राहका पर्यंत पोहचविले जायचे.
गावाला लागुनच डोंगर असल्याने या गावातील नागरिकांनी याच दगडाचा वापर घर बांधकामात केला. कवेलूचे घर असो वा स्लॕब. झोपडी असो वा जनावरांचा गोठा.भिंती दगडांचाच ठरलेल्या.या गावाची दगडांशी घट्ट मैत्री असली तरी येथिल नागरिक मात्र गोड स्वभावाचे आहेत. आज दगडांची घरे फार कमी बांधली जातात. त्यामुळे दगडाला मागणी नाही. त्यामुळे काही गावकरी शेतीकडे वढलेत तर काही व्यवसाय टाकून बसलेत.काही मजूरी करून उदर्निवाह करीत आहेत. दगडावर पडणारे लोखंडी घन आता धूळ खात पडले आहेत.मात्र गावाची ओळख आजही दगडांचे गाव अशीच आहे.
किरमीरी गावात कोरोनाचे आठ बाधित सापडले आहेत. गावात धाकधूक वाढली आहे. कोरोनाने दिलेल्या हादर्यांनी दगड चिरणार्या हातांना कंप सूटला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.