Amaravati Constituency Lok Sabha Election Result: अमरावतीत भाजपवर 'प्रहार'; काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचा विजय; नवनीत राणांचा पराभूत

Amaravati Lok Sabha Election Result 2024 BJP Navneet Rana defeated by Congress Balawant Wankhede Prahar Dinesh Bub made key role : या ठिकाणी तिरंगी लढत झाली यामध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला आहे.
Amaravati Constituency Lok Sabha Election Result
Amaravati Constituency Lok Sabha Election Result
Updated on

Amaravati Lok Sabha Election Result 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा विजय झाला आहे. या ठिकाणी प्रचारचे उमेदवार दिनेश बूब यांनीही इथं चांगली लढत दिली.

अमरावती लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. इथं एकही भाजपचा आमदार नाही, गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीनंतर भाजपला साथ दिली होती.

भाजपची बाजू मांडताना त्यांनी प्रसंगी उद्धव ठाकरे व ‘मविआ’ सरकावरच्या नाकीनऊ आणलं होतं. ‘मातोश्री’बाहेर हनुमानचालिसा पठण करण्याचा मुद्दाही विशेष चर्चेत राहिला. त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचाही मुद्दा यंदा त्यांना उमेदवारी मिळेपर्यंत चर्चेत राहिला. कोर्टानं त्यांचं जात प्रमाणपत्र योग्य ठरवण्यापूर्वी भाजपनं त्यांना उमेदवारी जाहीर केली होती.

यंदा किती मतदान झालं?

अमरावती लोकसभेसाठी यंदा 64.02 टक्के मतदान झालं. यंदा गेल्या निवडणुकीपेक्षा चार टक्क्यांनी मतदान वाढलं आहे. इथं सर्वाधिक मतदान मेळघाट विधानसभा मतदार संघात झालं आहे. आता हे वाढलेले मतदान बळवंत वानखेडे यांच्या बाजूनं झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

२०१९ मध्ये काय होती स्थिती?

नवनीत राणा (अपक्ष) विजयी मते : ५,१०,९४७

आनंदराव अडसूळ (शिवसेना) मते : ४,७३,९९६

गुणवंत देवपारे(वंचित बहुजन आघाडी) मते : ६५,१३५

अरुण वानखेडे (बसप) मते : १२,३३६

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ३६,९५१

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

मेळघाटातील पाणी, आरोग्याचा गंभीर प्रश्न.

जिल्ह्यातील विविध भागात कृषीवर आधारित उद्योगांची वानवा.

बेलोरा विमानतळावरून अद्याप ‘टेकऑफ’ नाही.

जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतची उदासिनता

तरुणांचा रोजगाराचा गंभीर प्रश्न

विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

अचलपूर - ६८.८४ टक्के

अमरावती - ५७.५२ टक्के

बडनेरा - ५५.७८ टक्के

दर्यापूर - ६६.८८ टक्के

मेळघाट - ७१.५५ टक्के

तिवसा - ६४.१४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.