"कष्टकरी घरातील मुलगा गेला, राज ठाकरेंनी मुंबई सोडून..."; कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याच्या निधनानंतर मिटकरी काय म्हणाले?

Amol Mitkari car attacked by MNS workers in Akola: तोडफोडीच्या काही तासांनंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि त्यांना अकोल्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
Amol Mitkari car attacked by mns
Amol Mitkari car attacked by mnsesakal
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (राकांपा) विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची अकोल्यात तोडफोड केली. पुण्यातील पुरावरुन राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे असा वाद निर्माण झाला. राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर अमोल मिटकरींनी पलटवार केला.  

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला. ही टीका मनसेच्या चांगलीच जिव्हारी लागली. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेत सहभागी असलेल्या मनसे कार्यकर्त्यांपैकी जय मालोकर (२४) याचा हृदयविकाराने अकोला येथील सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी अकोला जिल्हा महिला शाखा अध्यक्षा सह १३ मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गैरकायदेशीर जमाव, जखम आणि आगजनीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

राज ठाकरे आणि मिटकरी यांच्यातील वाद-

राज ठाकरे यांनी अलीकडेच झालेल्या पुण्यातील पुरामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार पुण्यात नसताना धरण भरलं कसं, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर पलटवार करत मिटकरी यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील सुपारीबाज व्यक्ती म्हटले होते. याच कारणामुळे अकोला येथील सरकारी अतिथिगृहाजवळ ३० ते ४० मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या कारची तोडफोड केली.

Amol Mitkari car attacked by mns
Ajit Pawar: वेशांतर करून दादा विमानापर्यंत पोहोचले कसे? सुरक्षा कशी भेदली? जाणून घ्या

मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू-

तोडफोडीच्या काही तासांनंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली आणि त्यांना अकोल्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ईसीजी रिपोर्टमध्ये हृदयविकाराची पुष्टी झाली आणि उपचारांच्या प्रक्रियेपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अमोल मिटकरींची प्रतिक्रिया-

मिटकरी म्हणाले, "एका कष्टकरी घरातील मुलगा गेला. मी त्या कुटुंबाची भेट घेईन. माझी मनसे पक्षप्रमुखांना विनंती आहे की, त्यांनी मुंबई सोडून इथं यावं. सर्वसामान्यांचा राजकारणात जीव जाणार असेल तर हे कुठलं राजकारण आहे? माझा पक्ष तसा आदेश मला देत नाही. एखाद्याचा जीव जाणं आणि अशा प्रकारे एखाद्या गोरगरीब मुलांच्या खांद्याचा वापर जर कोणता पक्ष करत असेल तर त्याचा निषेध झालाच पाहिजे."

Amol Mitkari car attacked by mns
Maharashtra Rain Update: पुणे, मुंबईत धो-धो बरसतोय, काळजी घ्या!...राज्यात आणखी कुठ बरसणार? IMD चा अलर्ट जारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.