कारंजा : आमच्या पक्षाने धर्मनिरपेक्षता व विचारधारा सोडली नसून त्याच्यानुसारच आम्ही सरकारमध्ये राहून काम करीत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी कारंजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच सामान्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.