Amravati Accident: काळरात्र! दुचाकींची समोरासमोर धडक; चार ठार तर दोघे गंभीर जखमी

शेख नजीर शेख हसन व ओम रवींद्र मसराम हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Amravati Accident
Amravati Accident
Updated on

चांदूरबाजार: चांदूरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असलेल्या चांदूरबाजार ते वलगाव रोडवरील निसर्ग बार समोर दोन दुचाकी समोरासमोर एकमेकांवर धडकल्या. या अपघात चार जण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली.

अमरावती तालुक्यातील मासोद येथील रहिवाशी सौरभ किशोर मसराम (वय २२) हा मित्र गोलू ऊर्फ धीरज राजू टवलारे (वय २०, रा. शेवती) व रवींद्र मसराम (वय २० रा. मासोद) यांच्यासह दुचाकीने बहिरम यात्रेवरून चांदूरबाजार-वलगाव मार्गे जात होते. तर अमरावती येथील कार्यक्रम आटपून चांदूरबाजारकडे येण्यासाठी शेख जुनेद शेख बिस्मिल्ला खान (वय २१ रा. ताजनगर, चांदूरबाजार) हे दुचाकीने शेख नसीम शेख हसन (वय ४० रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार) व शेख नजीर शेख हसन (वय ५५ रा. पिंपळपुरा, चांदूरबाजार) या दोन नातेवाईकांसह चांदूरबाजारकडे येत  होते.

दरम्यान निसर्ग बार समोर दोन्ही वेगवान गाड्यांची आमनेसामने टक्कर झाली. त्यात चार जण ठार झाले. मृतांमध्ये सौरभ किशोर मसराम (वय २२), शेख जुनेद शेख बिस्मिल्ला खान (वय २१) ,गोलू ऊर्फ धीरज राजू टवलारे (वय २०), शेख नसीम शेख हसन (वय ४०) यांचा समावेश आहे.

Amravati Accident
Manoj Jarange: "सरसकट आरक्षण द्या अन्यथा रक्ताचे नातेवाईक कोण हे स्पष्ट करा"; जरांगेंचा उपसमितीच्या बैठकीत सवाल

यापैकी सौरभ व गोलू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोघांना दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेख नजीर शेख हसन व ओम रवींद्र मसराम हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना पीडीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच चांदूरबाजारचे प्रभारी ठाणेदार निखिल निर्मळ, एपीआय प्रमोद राऊत, दिलीप मुळे, भूषण अवघड, विनोद इंगळे, गौरव पुसतकर, नीकेश गाढवे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी रात्रीच उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल नवघिरे यांनी भेट दिली. (Latest Marathi News)

Amravati Accident
Satej Patil: सतेज पाटील-महाडिक वाद पुन्हा उफाळला! राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.