Amravati Dam Water Level : अमरावती विभागातील धरणांमध्ये केवळ ३८ टक्‍के पाणीसाठा

पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये केवळ ३८.६१ टक्‍के पाणीसाठा झाला आहे.
amravati dam water storage 38 percent rain weather update agriculture
amravati dam water storage 38 percent rain weather update agricultureSakal
Updated on

Amravati : पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीदेखील अमरावती विभागातील लहान-मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये केवळ ३८.६१ टक्‍के पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प व सिंचन तलावांमध्‍येही समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात सिंचन प्रकल्‍प पूर्ण क्षमतेने भरणार काय. यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

अमरावती विभागातील ९ मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये ५४०.५० दशलक्ष घनमीटर म्‍हणजे ३८.६१ टक्‍के पाणीसाठा झाला असून एकूण २७ मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये ३४९.८२ दलघमी (४५.३३ टक्‍के), तर २५३ लघुप्रकल्‍पांमध्‍ये २२२ दलघमी (२३.९४ टक्‍के) पाणीसाठा आहे. हे प्रकल्‍प पूर्ण क्षमतेने भरण्‍यासाठी अमरावती विभागातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. सर्व लहान-मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये पाणीसाठा केवळ ३५.८८ टक्‍के इतका झाला आहे.

गेल्‍या वर्षी १५ जुलैअखेर मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये ६११ दलघमी म्‍हणजे ४३.६९ टक्‍के पाणीसाठा झाला होता, तर मध्‍यम प्रकल्‍पांमध्‍ये ३२२ दलघमी म्‍हणजे ४१.७८ टक्‍के पाण्‍याची साठवणूक झाली होती. सर्वच प्रकल्‍पांमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत आतापर्यंत पाच ते दहा टक्‍के पाणीसाठा कमी आहे. पावसाळ्याचे अडीच महिने अजून बाकी आहेत.

पश्चिम विदर्भातील बहुतांश धरणांचे पाणलोट क्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगा, मध्‍य प्रदेशात आहे. या पाणलोट क्षेत्रातील पाऊस मंदावल्‍याने धरणांमध्‍ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले. प्रतिवर्ष धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस हा १५ ऑगस्टपर्यंत पुरेसा होत असतो, पण यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. लघूप्रकल्‍प आणि सिंचन तलावांची स्थिती चिंतनीय आहे.

प्रकल्पातील सद्यःस्थिती

अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या २६६ दलघमी (४७ टक्के), पूस ५३ दलघमी (५८ टक्के), अरुणावती ६१ दलघमी (३६ टक्के), बेंबळा ८३ दलघमी (४५ टक्के), काटेपूर्णा २४ दलघमी (२८ टक्के), वाण २१ दलघमी (२५ टक्के), नळगंगा २२ दलघमी (३२ टक्के), पेनटाकळी ७ दलघमी (१३ टक्‍के) तर खडकपूर्णा प्रकल्‍पात शून्‍य टक्‍के पाणीसाठा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.