Amravati Lok Sabha 2024: अमरावतीत 'कांटे की टक्कर'! नवनीत राणा की आनंदराव अडसूळ कोणाच्या पारड्यात पडणार उमेदवारी

Amravati Lok Sabha 2024: अमरावती मतदारसंघात जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांत कुठेही भाजपचा आमदार नाही. यंदा काट्याच्या लढतीचे संकेत मिळत आहेत.
Amravati Lok Sabha 2024
Amravati Lok Sabha 2024Esakal
Updated on

Amravati Lok Sabha 2024: अमरावती मतदारसंघात जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांत कुठेही भाजपचा आमदार नाही. यंदा काट्याच्या लढतीचे संकेत मिळत आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीनंतर भाजपला साथ दिली. त्यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचाही मुद्दा गाजला. भाजपची बाजू मांडताना त्यांनी प्रसंगी उद्धव ठाकरे व ‘मविआ’ सरकावर टीका करण्याची खिंड लढवली. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’बाहेर हनुमानचालिसा पठण करण्याचा मुद्दाही विशेष चर्चेत राहिला.

२०१९ चे चित्र

नवनीत राणा (अपक्ष) विजयी मते : ५,१०,९४७

आनंदराव अडसूळ (शिवसेना) मते : ४,७३,९९६

गुणवंत देवपारे(वंचित बहुजन आघाडी) मते : ६५,१३५

अरुण वानखेडे (बसप) मते : १२,३३६

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ३६,९५१

Amravati Lok Sabha 2024
Hatkanangale Lok Sabha 2024: हातकणंगल्यात राजू शेट्टींमुळे येणार रंगत; शेट्टींच्या होमपीचवर सर्वच पक्ष सावध

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : अपक्ष

Amravati Lok Sabha 2024
Latur Lok Sabha 2024: भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत; काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी

सद्य:स्थिती

महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नाही. काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.

युवा स्वाभिमानच्या खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही.

दलित, मुस्लीम मते महाविकास आघाडीकडे आकृष्ट झाल्यास महायुतीचा ताप वाढेल.

नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.

Amravati Lok Sabha 2024
Sangli Lok Sabha 2024: भाजपच्या बालेकिल्ल्यात स्वाभिमानी पक्ष लावणार सुरुंग? भाजप, काँग्रेस भिडल्यास तुल्यबळ लढत

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मेळघाटातील पाणी, आरोग्याचा गंभीर प्रश्न.

जिल्ह्यातील विविध भागात कृषीवर आधारित उद्योगांची वानवा.

बेलोरा विमानतळावरून अद्याप ‘टेकऑफ’ नाही.

जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या विकासाबाबतची उदासिनता

Amravati Lok Sabha 2024
Hingoli Lok Sabha 2024: हिंगोलीत दुरंगी लढतीची शक्यता; वंचित, बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()