Amravati : मिनी मंत्रालयाला लागले विधानसभेचे डोहाळे; जि.प.च्या ९ माजी सदस्यांची तयारी

Vidhansabha
Vidhansabha
Updated on

अमरावती, : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हापरिषदेच्या आठ ते ९ माजी पदाधिकारी, सदस्यांनी आता थेट विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येणाऱ्या काळात जिल्हापरिषद, पंचायत समितीची निवडणूक दृष्टिक्षेपात नसल्याने या सदस्यांनी आता विधानसभा लढविण्याची तयारी सुरू केली आहे.

Vidhansabha
Mumbai Crime : दादरमधील 'त्या' अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास एका वर्षांचा कालावधी आहे. मात्र त्यापूर्वी जिल्हापरिषद निवडणूक होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही. काही महिन्यांपुर्वी जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीची गट व गणांची रचना करण्यात आली होती, त्यावेळी निवडणुकीची घोषणा होणार असे समजून सगळेच इच्छुक कामाला लागले होते, मात्र नंतरच्या काळात निवडणुकीचे भिजत घोंगडे कायम आहे.

Vidhansabha
Ashadhi Wari 2023 : आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, खासदार सुप्रिया सुळे संतापल्या...

मात्र आता माजी पदाधिकारी व सदस्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. जिल्हापरिषदेचे काही माजी पदाधिकारी व माजी सदस्यांनी विधानसभेच्या दृष्टीने स्वतःला ‘प्रेझेन्ट’करण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी तर पोस्टर्स, बॅनर्सच्या माध्यातून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. विशेष म्हणजे मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे, तसेच विविध स्वरुपाच्या शिबिरांच्या आयोजनांमध्ये मागील काही दिवसांत वाढ झाली आहे.

दोन सदस्यांनी गाठली होती विधानसभा

मागील टर्म मध्ये दोन जिल्हापरिषद सदस्य थेट विधानसभेत पोहोचले होते. बळवंत वानखडे तसेच देवेंद्र भुयार या दोन जिप सदस्यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले होते. तसाच काहीसा चमत्कार आपल्या बाबतीतही होईल, या आशेने अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()