अमरावती : २१ दिवसांच्या संसाराचा वर्धा नदीत शेवट

अंगावरची हळद अजून ओली असतानाच दोघांच्याही संसाराचा शेवट झाला.
amravati
amravatisakal
Updated on

वरूड (अमरावती) : वृषाली अन् अतुल...ती १९ वर्षांची तर तो २५ वर्षांचा...२१ दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली अन् संसार सुरू झाला. २१ दिवसांच्या गोडी-गुलाबीच्या संसारात भावी आयुष्याचे स्वप्न रंगविले. पण, नियतीच्या मनात काय होतं कोणास ठाऊक? वर्धा नदीत नाव उलटली अन् अंगावरची हळद अजून ओली असतानाच दोघांच्याही संसाराचा शेवट झाला.

वरूड जिल्ह्यातील गाडेगाव येथील वृषालीचे वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) तालुक्यातील तारासावंगी येथील अतुल वाघमारे याच्यासोबत लग्न जुळले. गेल्या २२ ऑगस्टला त्यांचे लग्न झाले. नव-सहजीवनात प्रवेश करून संसाराचा रथ अतुलसोबत चालवण्यासाठी वृषाली सासरी आष्टीला गेली. पण, अचानक वृषालीच्या भावाचे निधन झाले. त्याच्या अकाली जाण्याचे दुःख मनात घेऊन ती पती अतुलसोबत माहेरी गाडेगावला आली.

amravati
अकोला : तांदूळ खरेदीच्या नावाखील चोरांची टोळी सक्रिय

मंगळवारी (ता. १४) भावाच्या दशक्रियेचा कार्यक्रम होता. ती सकाळी नातेवाईकांसोबत श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीत राख शिरवायला गेली. नावेत बसून राख शिरविण्यासाठी सारे नदीच्या पात्रात गेले. राख शिरविली व परतण्यासाठी ते पलटले. पण तोच नदीनं रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे नाव अनियंत्रित झाली अन् वृषाली व अतुलसह तिचे ११ नातेवाईकही बुडाले. वृषाली आणि अतुलचा उण्यापुऱ्या २१ दिवसांचा संसार क्षणार्धात वर्धा नदीत बुडाला, तो पुन्हा न सावरण्यासाठीच. या घटनेने गेल्या दोन दिवसांपासून अतुलच्या तारासावंगी गावात शोककळा पसरली आहे. तब्बल ४८ तासांच्या प्रयत्नानंतर आज गुरुवारी दोघांचेही मृतदेह सापडले. शवचिकित्सेनंतर दोघांचेही मृतदेह गावात आणताच सारं गाव शोकाकुल झाले होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले.

चितेवरही लग्नगाठ कायम

आपल्या संस्कृतीत लग्न संस्काराच्या वेळी वराचा शेला व आणि वधूच्या पदराची लगीनगाठ बांधण्याची रीत आहे. ही गाठ सातजन्म कायम रहावी, म्हणून ती घट्ट बांधली जाते. वृषाली आणि अतुलची लगीनगाठ २१ दिवसांपूर्वी इतकी घट्ट बांधल्या गेली की काळालाही ती सोडता आली नाही. आज त्या दोघांचेही मृतदेह सापडलेही सोबतीने आणि दोघांनाही तारासावंगी येथे अग्नी देण्यात आला, तोही एकाच चितेवर सोबतीने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.