Amravati News : वरात पंगतीच्या जेवणातून विषबाधा! सत्तावीस जणांवर उपचार सुरू

food poison
food poison
Updated on

अचलपूर : तालुक्यातील येलकीपूर्णा येथे एका वरात पंगतीत जेवल्यानंतर अचानक काही नागरिकांची प्रकृती रात्री बिघडली. पोटदुखी, मळमळ, जुलाब होऊ लागल्याने तत्काळ त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करून डॉक्टरांनी उपचाराला प्रारंभ केला आहे. यामध्ये महिला व चार बालकांचा समावेश असून जवळपास सत्तावीस जणांवर उपचार सुरू आहे.

food poison
Tuljapur News: तुळजाभवानी भाविकांसाठी मोठी बातमी; तोकडे कपडे परिधान केल्यास मंदिरात प्रवेश नाही

अचलपूर तालुक्यातील येलकीपूर्णा येथील दीपक पवार यांच्या येथील विवाह समारंभ १५ मे रोजी दर्यापूर येथे संपन्न झाला. त्याबद्दल १६ मे रोजी वरात पंगतीचे जेवण आयोजित करण्यात आले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवणावळी सुरू होत्या. लग्नाघरी आलेल्या व गावातील काही नागरिकांना रात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अचानक उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला.

food poison
BRS: "काना मागून आली अन् तिखट झाली.." मविआ, महायुतीला धक्का देण्यासाठी 'हा' पक्ष सज्ज

ही संख्या एकामागे एक वाढत असल्याने तत्काळ या बाबतची माहिती सुरेश पवार व सदाशिव सोळंके यांनी माजी पंचायत समिती सभापती श्रीधर काळे यांना दिली. श्रीधर काळे यांनी तत्काळ रुग्णवाहिका चालकांना येलकी येथे बोलावून या सर्व रुग्णांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून उपचाराला सुरवात केली.

या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या रुग्णांमध्ये सहा चिमुकले तर काही वृध्द पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये येलकीपूर्णा येथील दिव्या विठ्ठल चव्हाण (११), शिवप्रसाद पवार (१५), शिवानी सोळंके (१७), धनश्री पवार (२०), ऋषिकेश पवार (२१) सदांशिव सोळंके (४५), अनिल पवार (२५), जय सोळंके (४०) आणि पूर्णा नगर येथील चरणदास सोळंके (३८), गौरव सोळंके (१२), धीरज शरद पवार (८),मानव पवार (९), शुभम पवार (४),निरंजन पवार (८), दिव्या विठ्ठल चव्हाण (१२) प्रङ्कुल्ल चव्हाण (८), डिंपल चव्हाण (३), सुरेश पवार (५५),बलदेव चव्हाण (६५), निर्मल चव्हाण (५५), शोभा पवार (५२), नामदेव चव्हाण (६५), पुनम चव्हाण (२९),सोनू सोळंके (३०), सरिता सोळंके (४२), जया सोळंके (३५), सिंधू पवार (३), लता सोळंके (३५), जीवन शरद पवार (१२), शिवम भरत पवार (१३)पूर्वा चव्हाण (८) असे एकूण २७ जणांना अन्नातून बाधा झालेल्या रुग्णांची नावे आहेत.

या घटनेची माहिती दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली तसेच डॉक्टरांना सुद्धा उपचारात कोणतीही हयगय करू नका सर्व सुविधा द्या अशा सूचनाही केल्या.

"उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू केले. त्यामुळे सर्वांची प्रकृती सध्या ठीक आहे, यामध्ये आठ बालकांचा समावेश आहे. सर्व रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. चोवीस तासांनंतर सुटीचा निर्णय घेण्यात येईल."
-डॉ. सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अचलपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.