Amravati News: आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणाव! पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोल्हापूरची पुनरावृत्ती टळली

वलगावात दोन गट समोरासमोर उभे ठाकल्याने राडा
Amravati News
Amravati Newsesakal
Updated on

अमरावती: एका व्यक्तीने स्वत:च्या मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यामुळे वलगावात दोन गट समोरासमोर उभे ठाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. भीतीपोटी परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली.

शनिवारी (ता. १०) एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवले. त्यामुळे दुसऱ्या गटाने त्यासंदर्भात वलगाव पोलिस ठाण्यामध्ये दुपारी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी स्टेट्स ठेवणाऱ्या व्यक्तीची चौकशी सुरू केली. त्यानंतर त्या व्यक्तीने पोलिसांच्या विनंतीनंतर आक्षेपार्ह स्टेट्स डिलीट केले.

Amravati News
Sharad Pawar: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच ! सुप्रिया सुळे यांच्यासोबत 'या' नेत्याला बनवलं कार्यकारी अध्यक्ष

परंतु चर्चा पसरत गेल्यामुळे दोन्ही बाजूने वलगावच्या मुख्य चौकात, बाजारपेठ परिसरात अडीचशे ते तीनशे लोक समोरासमोर उभे ठाकले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपापली प्रतिष्ठाने बंद केली. वलगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांसोबत चर्चा केली.

त्यानंतर अतिरिक्त पोलिस कुमक वलगावात तैनात करण्यात आली. पोलिस मुख्यालयासह चार ते पाच ठाण्यातील पोलिस, क्युआरटी पथक, वज्र, वरुण वाहनांचा ताफा पोहोचला. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साठी, सागर पाटील यांच्यासह पोलिस पोहोचले.

Amravati News
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‘आरोग्या’ची चिंता! स्मरणपत्रानंतरही निधी नाही; जिल्हा रुग्णालयाचे काम बंद

त्यानंतर अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर तणाव निवळला व जनजीवन सुरळीत झाले. दुकानेही उघडली, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

सोशल मीडियावर कुण्याही समाजाच्या भावना दुखावतील असे मॅसेज किंवा स्टेट्स ठेवू नये, समजूत काढल्यानंतर वलगाव येथील परिस्थिती शांत आहे. नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये, काही तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

-नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त, अमरावती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.