नागपूर : अमरावती मार्गावरील वाडी येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून वाहतुकीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या महामार्ग प्राधिकरणाने (एनएच) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. विदर्भातील महामार्गांच्या दुरवस्थेबाबत ॲड. अरूण पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.