Comrades Marathon : कॉम्रेड मॅराथॉनमध्ये अमरावतीचे सहा धावपटू

दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटरच्या स्पर्धेत १३२ देशांचा सहभाग.
Comrades Marathon
Comrades Marathonsakal
Updated on

अमरावती - जगातील सर्वात खडतर मॅराथॉनपैकी एक असलेली ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅराथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार असून जगभरातील जवळपास १३२ देशांतून धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कौतुकाची बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमरावतीचेही सहा धावक सहभागी होत आहेत. त्यामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सेवानिवृत्ती विक्रीकर उपायुक्त तसेच अमरावती हाफ मॅराथॉन संचालक दिलीप पाटील, पोलिस निरक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलिस निरीक्षक सतीश उमरे व म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला साळुंखे-बद्रे यांचा यामध्ये समावेश राहणार आहे.

९ जून रोजी आफ्रिकेतील डर्बन शहरातून पहाटे साडेपाचला ही मॅराथॉन सुरू होणार असून ती पिटरमनटिर्जबर्ग या शहरात सायंकाळी साडेपाचला समारोप होणार आहे. विशेष म्हणजे दिलीप पाटील यांनी ही कॉम्रेड मॅराथॉन आठ वेळा यशस्वीरित्यापूर्ण केली असून यावर्षी ते नवव्यांदा या मध्ये सहभागी होणार आहे.

दीपमाला साळुंखे यांनी मागील वर्षी २०२३ मध्ये ही स्पर्धा ११ तास ५० मिनिटांत पूर्ण केली होती. अमरावतीचे हे सहा धावक ४ जून रोजी अंबा एक्सप्रेसने मुंबईला प्रस्थान करणार असून तेथून पुढे दक्षिण आफ्रिकेला प्रयाण करतील. अमरावतीच्या स्पर्धकांनी जानेवारीपासूनच या खडतर स्पर्धची तयारी सुरू केली असून पाच महिन्यांच्या सरावादरम्यान सर्व स्पर्धकांनी दोन वेळा ६० किलोमीटरचे लॉंगरन पूर्ण केले आहे. अमरावती रोड रनर्स ग्रुप, अमरावती सायकलिंग असोशिएशन तसेच पोलिस आयुक्तालयाच्या वतीने या धावकांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

सलग आठ वेळा यश

सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील यांनी जगातील खडतर अशी कॉम्रेड मॅराथॉन सलग आठ वेळा पूर्ण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पाचही धावकांनी पाच महिन्यांचा सराव पूर्ण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.