तिवसा : नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धकडं दिली या अपघातात ट्रक चालक व वाहक असे दोनजणं जखमी झाले असून त्यांच्यावर तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे, ही घटना दिनांक 1जुलै रात्री 9वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली. चालक संतोष सिंग वय 36, व वाहक गोपाल सिंग वय 55 असे अपघातात जखमी झालेल्याची नावे आहे.
गेल्या महिण्याभऱ्यापासून राष्ट्रीय महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत आरजे 19जीएफ 3723 क्रमांकाचा ट्रक हा आयआरबी व पोलीसांच्या मेहेरबानीमुळे अपघातला निमंत्रण देत होता अखेर शुक्रवार रोजी रात्री 9वाजता या उभ्या असलेल्या ट्रकला मागून भरधाव येणाऱ्या जिजे 36टी 4425या क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिल्याने मोठा अपघात झाला.
हा अपघात इतका भयानक होता की ट्रकचा समोरील भाग चेंदामेंदा होऊन चालक व वाहक यात तासभर अडकून पडले होते अखेर उपस्थिती नागरिकांनी धाव घेत मदतीचे कार्य केले व जेसीबीच्या साहाय्याने शर्तीचे प्रयत्न करून त्याना सुखरूप बाहेर काढण्यात आले,यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती, अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती.पवन शापामोहन, फिरोज शहा, सागर राऊत, दिनेश नागदेवते, आंनद सुरटकार, सम्यक हगवणे,प्रवीण ढोबाळे, हर्षल कडू यांनी मदत कार्य केले,यावेळी नगराध्यक्ष योगेश वानखडे उपस्थित होते..
शहरातील काही ठिकाणी पार्किंगचा प्रश्न गांभीर होत चाललं असून पेट्रोल पंप परिसरात सर्वाधिक पार्किंगची समस्या निर्माण होते व यामुळे अपघाताची शक्यता सुद्धा आहे, राष्ट्रीय महामार्गावर वाहन उभे होताच वाहतूक पोलीस चलन करतात परंतु गेल्या महिण्याभऱ्यापासून पोलीस स्टेशनं समोर नादुरुस्त असलेल्या ट्रकला येथून येणाऱ्या - जाणाऱ्या सुज्ञ नागरिकांनी हटविण्याच्या सूचना आयआरबी व पोलीस प्रशासनाला दिला मात्र तरी सुद्धा हा ट्रक हटविण्यात आला नाही परिणामी या ट्रकमुळे भीषण अपघात होऊन दोनजणं थोडक्यात बजावले आहे, महामार्गावरील पार्किंगच्या समस्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होणार हे निश्चित.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.