अमरावती : घोटभर पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा; खडीमल गावातील प्रकार

तालुक्यात १८ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा
घोटभर पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा
घोटभर पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धाsakal
Updated on

चिखलदरा अमरावती : मेळघाटातील खडीमल हे गाव चिखलदऱ्यायापासून शंभर किलोमीटर अंतरावर वसलेले असून गेली वीस पंचवीस वर्ष आदिवासी बांधव दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करून आपली तहान भागवितात. पाण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष पाहून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. मात्र, शासन-प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही.

या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे. अतिशय दुर्गम भागात वसलेले असल्याने बाकीच्या सुविधा सुद्धा गावात नाहीत. पाण्याचे मोठे कोणतेच स्रोत नाही. या गावाच्या बाहेर पाचशे मीटर अंतरावर एक कोरडी विहीर आहे. या विहिरीतच सध्या शासनाने सुरू केलेले टँकर खाली केले जाते आणि टँकर पोहोचताच पाण्यासाठी आदिवासी बांधवांची एकच गर्दी होते.

सध्या मेळघाटात अनेक गावात टँकर सुरू आहेत आणि प्रत्येक गावात अशीच परिस्थिती पहावयास मिळते. घोटभर पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सध्या मेळघाटात पाहायला मिळते. विहिरीत टँकरच्या मादतीने पाणी टाकण्यात आल्यावर ते पाणी ओढण्यासाठी आदिवासी बांधवांमध्ये चांगलीच चढाओढ असते. त्यातूनच विहिरीतून पाणी काढण्याच्या या जीवघेण्या प्रकारातून एखाद्याचा तोल जाऊन ती व्यक्ती विहिरीत सुद्धा पडण्याचा धोका नाकारता येत नाही.

...तर होतात गावात भांडणे

पाणी विहिरीत नाही टाकले व गावात वाटप केले तर गावात मोठ्या प्रमाणात भांडणे होतात. या अगोदर गावात पाणी वाटपाचा प्रयोग केला होता. पण भांडणे झाली, त्यामुळे पाणी विहिरीत टाकले तर लोक आपापल्या परीने पाणी घेऊन जातात व गावात भांडणे होत नाहीत, अशी माहिती चिखलदरा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ सहाय्यक नरेंद्र ठाकरे यांनी दिली.

तालुक्यात १८ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा

चिखलदरा तालुक्यातील १०० गावात पाण्याची समस्या आहे. परंतु सध्या शासनाच्या वतीने फक्त अठरा गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये आवागड, खंडूखेडा, खोगडा, एकवीरा, गौरखेडा बाजार, धरमडोह, बहादरपूर, आखी, नागापूर, सोमवार खेडा, मोथा, आलाडोह, लवादा, बगदरी, तोरणवाडी, तारुबांदा, रायपूर, खडीमल आदी गावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.