अंकिता जळीतकांड : आरोपीतर्फे वकीलपत्र सादर; विकेश नगराळेची पत्नी, कुटुंबीयांची उपस्थिती

Ankita filed a writ petition on behalf of the accused in the arson case
Ankita filed a writ petition on behalf of the accused in the arson case
Updated on

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिता जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्‍की ऊर्फ विकेश नगराळे याच्यावर गुरुवारी येथील न्यायालयात भारतीय दंड सहिता नुसार आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणात आरोपी विकेशतर्फे वकीलपत्र सादर करण्यात आले. या खटल्याची पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या ११, १२ आणि १३ तारखेला होणार आहे.

येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माजगावकर यांच्या समोर आरोपीच्या स्वाक्षरीने नागपूरचे ॲड. भूपेंद्र सोने आणि ॲड. ढेकले यांनी वकीलपत्र सादर केले. आरोपी विकेश नगराळे याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते.

न्यायाधीशाने यातील नेमके कोणते वकील तुमची केस बघणार आहे, अशी विचारणा केली असता आरोपीने ॲड. भूपेंद्र सोने हे वकील म्हणून काम पाहतील, असे न्यायालयाला सांगितले.

यानंतर नागपूरचे आणखी एक वकील आरोपीचे वकीलपत्र सादर करण्यासाठी आले होते; मात्र आरोपीने ॲड. भूपेंद्र सोने यांचे नाव कायम ठेवले. त्यामुळे यापुढील सुनावणीत आरोपीतर्फे ॲड. सोने सहभाग घेतील.

समाजमन खिन्न करणाऱ्या प्रा. अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे स्वतः मागील तारखेला न्यायालयात हजर झाले होते. त्यांनी लेखी आरोप न्यायालयासमोर सादर केले. परंतु, आरोपीतर्फे वकीलपत्र सादर न झाल्याने या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही.

दरम्यान यापुढील तारखांना शासकीय वकील म्हणून प्रसाद सोईटकर काम पाहणार आहे. पुढील तारखेला साक्षीपुरावे नोंदविले जातील. या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव, आरोपीची पत्नी आणि कुटुंबीय उपस्थित होते. या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()