नेर (जि. यवतमाळ) : ‘कोण होणार महाराष्ट्राचा बालकवी २०२१?’ या राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात नेर परसोपंत येथील शांतीनिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का शीतल संतोष बदुकले हिने बाजी मारली आहे. उच्च प्राथमिक गटातून महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकाचे विजेती होत बालकवी होण्याचा बहुमान अनुष्काने पटकाविला आहे.
विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना मुक्त आविष्काराची उच्चतम संधी लाभावी या हेतूने ‘कोण होणार महाराष्ट्राचा बालकवी?’ या स्वरचित काव्यगायन स्पर्धेचे भव्य आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले होते. प्राथमिक गट, उच्च प्राथमिक गट व माध्यमिक गटात घेतल्या गेलेल्या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांच्या भावअभिव्यक्ती व कलारसिकतेला आव्हान देणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्राचा बालकवी कोण होणार याची प्रचंड उत्सुकता लागली होती. उच्च प्राथमिक गटातून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या वर्ग सहावीच्या प्रतिभावान अनुष्का संतोष बदुकलेची सदर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तिच्या ‘कविता’ या स्वरचित कवितेला महाराष्ट्रभरातून पसंती मिळाली आहे. आकर्षक स्म्रृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन तिचा गौरव होणार आहे.
बालवयापासूनच शब्दांचे वेड असलेल्या अनुष्कांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. तिचे काव्यलेखन व सादरीकरण उत्तम दर्जाचे आहे. तिच्या कवितांचा संग्रह करीत आहे. कथाकथन, स्वरचित काव्य रचना, वक्तृत्वासोबतच तंत्रज्ञानातही अनुष्का अव्वल आहे. नुकतेच झालेल्या एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्या जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या अंतराळ मोहिमेतही ती सहभागी होती हे विशेष...
अनेक स्पर्धा गाजवलेल्या अनुष्का ही अष्टपैलू विद्यार्थिनी आहे. या लॉकडाउन काळामध्ये अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. महाराष्ट्राचा बालकवी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकापेक्षा एक सरस विद्यार्थी कविंना मागे टाकत अनुष्का महाराष्ट्राची बालकवी ठरली आहे. तिचे या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना व शिक्षकांना दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.