Video : तहसीलदाराने शिक्षकांना केलं सीमेवर उभं, हातात दिले दंडुके

Appointment for blockade of teachers in Chandrapur district
Appointment for blockade of teachers in Chandrapur district
Updated on

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. सरकारकडून सर्व उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कोरोनावर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. यामुळेच केंद्र सरकारकडून लॉकडाउन वाढविण्याचा विचार सुरू आहे. मात्र, याच कोरोनाने शिक्षकांच्या हातातील खडू हिसकावला आहे. त्याच्या हातात चक्‍क दंडुका आल्या आहेत. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्‍यात पाहायला मिळत आहे. 

कोरोना विषाणूने धावणारे जग थांबले. देश टाळेबंद झाले. घरा बाहेर पडू नका... घरातच राहा अशा सूचना केंद्र आणि राज्य सरकारकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे पोलिसांची पर्यायाने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. लॉकडाउनची प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणा दिवसरात्र करीत आहेत. पोलिस दलाची यंत्रणा अपुरी पडत असल्याने पोलिसांचा सोबतीला पोलिस मित्र उभे झाले आहेत. 

गृहविभागाची अपुरी पडलेली यंत्रणा भरून काढण्यासाठी जिवतीचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी एक आदेश काढला आहे. या आदेशानुसार शासकीय, निमशासकीय संस्थाच्या वर्ग तीनमधील कर्मचारी पोलिस मित्र म्हणून कार्य करणार आहेत. जिवती तालुक्‍यातील 105 कर्मचाऱ्यांची पोलिस मित्रासाठी नियुक्ती केली गेली आहेत. 

पोलिस मित्र म्हणून कार्य करणारे ते 105 कर्मचारी सहाय्यक शिक्षक आहेत. जिवती तालुक्‍यातील टेकामांडवा, वणी बुजरुक, जिवती पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र-तेलंगणा सिमेवर हे शिक्षक पहारा देत आहेत. अंतर्गत बंदोबस्तासाठीही शिक्षक पोलिस मित्राची भूमिका बजावित आहेत. लॉकडाउनमध्ये तालुक्‍यातील जवळपास 105 शिक्षकांचा खडा पहारा सुरू आहे. 

तहसीलदाराने काढला आदेश

विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा कोरोना विषाणूने चांगलाच चिमटा काढला आहे. लॉकडाउनमध्ये हातातील खडू गेला अन्‌ चक्क दांडा शिक्षकांचा हाती आला आहे. जिवती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी काढलेल्या आदेशाने तालुक्‍यातील 105 शिक्षक महाराष्ट्र-तेलंगाणाचा सिमेवर खडा पहारा देत आहे.

पोलिस "बोली'ने शिक्षकी हृद्याला वेदना...

शिक्षकांची बोलीभाषा शुद्ध आणि तितकीच गोड असते. या उलट पोलिसांची भाषा जरा राकटच असते. पोलिसांसाठी ती गरजेचीही आहे. मात्र, या भाषेचा शिक्षकांना चांगलाच त्रास होत आहे. पोलिसांचे ऐकेरी भाषेत बोलणे, कर्तव्यात कसूर केल्यास कार्यवाही करण्याचा भाषेमुळे पोलिसांबद्दल शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 

शिक्षकांच्या जिवाशी खेळ

तहसीलदाराने शिक्षकांची महाराष्ट्र-तेलंगाणाच्या सिमेवर नाकाबंदीसाठी नियुक्‍ती केली आहे. ही नियुक्‍ती करताना शिक्षकांसोबत कोणताही पोलिस अधिकारी दिलेला नाही. तसेच त्याच्यासाठी पाण्याची, मास्क व सॅनिटायझरची सुविधा केलेली नाही. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

आम्ही दुसऱ्या कामसाठी तयार

कोणत्या आदेशानुसार आम्हा शिक्षकाची नाकाबंदीसाठी नियुक्‍त केली, असा प्रश्‍न शिक्षकांकडून सरकारला विचारण्यात येत आहे. आम्ही गावामध्ये जनजागृती व सर्व्हे करण्यासाठी तयार आहोत. मात्र, अशी नियुक्‍त करून आमच्या जिवाशी खेळले जात आहे. तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.