अकोला - आभासी विश्वात रमलेल्या तरुणाईसाठी गुगलने धोक्याची घंटा वाजवली असून, काही धोकादायक ऍप्स डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा महत्त्वाचा डाटा चोरीला जाण्याच्या घटनांनंतर गुगलने सावधानतेचे पाऊल उचलले आहे.
इंटरनेटच्या आभासी विश्वात जगणाऱ्यांचं काही काळ मनोरंजन होत असले, तरी नकळत त्यांचा महत्त्वाचा डाटा चोरीला जात असतो. मात्र, वापरकर्त्यांना त्याची माहिती होत नसल्याने डोळे झाकून ते या आभासी विश्वात जगत असतात. विशेषतः तरुणाई या प्रकाराला जास्त आहारी गेली आहे. अशातच गुगलने डाटा चोरी करणाऱ्या काही मोबाईल ऍप्सची नावे जाहीर करून ती डिलीट करण्याचे आवाहनदेखील केले आहे. त्यामुळे तुमच्या मार्ट फोन्समध्ये ही ऍप्स असतील तर त्वरीत ती डिलीट करा, अन्यथा तुमचाही डाटा चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असा आहे धोका
या ऍप्सच्या माध्यमातून तुमचे बॅंक खाते, ई-मेल आणि सोशल मीडियाची खाती हॅक होण्याची शक्यता आहे.
कोणती ऍप्स धोकादायक आहेत?
बेबी रूम, मोटरट्रेल, टॅटू नेम, कार गॅरेज, जापनीज गार्डन, हाउस टेरेस, स्कर्ट डिझाइन, योग मेडिटेशन, शू रॅक, युनिक टीशर्ट, मेन्स शूज, टीवी रूआंग टामू, आयडिया ग्लाससेज, फॅशन मुस्लिम, ब्रेसलेट, क्लॉथिंग ड्रॉइंग, मिनिमलिस्ट किचन, नेल आर्ट, आइस्क्रीम स्टिक, रूफ, चिल्ड्रन क्लॉथ्स, होम सीलिंग, पाला बाजू, लिविंग रूम, बुकशेल्फ, निटेड बेबी, हेअर पेंट, वॉल डेकोरेशन, पेंटिंग मेहंदी, बॉडी बिल्डर, कपल शर्टस, विंडो डिझाइन, हिजाब स्टाइल, विंग चुन, फेंसिंग टेक्निक, लर्न टू ड्रॉ क्लॉथिंग इत्यादी.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, त्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन माध्यमांचा वापर करताना आवश्यक सतर्कता बागळण्याची गरज आहे. कोणालाही स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये. फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ पोलिसांना कळवा.
- सीमा दाताळकर, एपीआय, सायबर सेल, अकोला
|