सावधान! एप्रिल-मे महिन्यात सर्वाधिक उष्ण लहरी; नागपूर @ ४०.२; चंद्रपूर विदर्भात ‘हॉट’

April and May hottest Chandrapur hot in Vidarbha
April and May hottest Chandrapur hot in Vidarbha
Updated on

नागपूर : बेसुमार जंगलतोड आणि पाण्याचा उपसा, शहरीकरण आणि प्रदूषणाचे परिणाम आता मानवाला भोगावे लागत आहेत. यामुळे तापमान वाढ होत असल्याने यावर्षी एप्रिल-मे महिन्यात उष्ण लहरी मनुष्याला भाजून काढणार आहेत, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अतितापमान आणि उष्ण लहरींचे वर्ष म्हणून यंदाच्या वर्षाची नोंद होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मार्च महिन्याच्या शेवटी उष्ण लहरी वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य भारत, उत्तर, पूर्व भारतात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील. मार्च ते मे महिन्यात ओडिशा, झारखंड येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअस अधिक किंवा त्यापेक्षाही अत्याधिक असेल.

दक्षिण भारतात विदर्भ, महाराष्ट्र, तेलंगण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात तापमान ०.५ अंश सेल्सिअस अधिक राहील. तापमान कमी असले तरी प्रचंड उष्ण लहरींचा प्रकोप वाढू शकतो. सर्वाधिक तापमानवाढ दक्षिण आशियात होणार आहे. २१ व्या शतकाच्या शेवटी भारतात जीवन असह्य होईल असा गंभीर इशाराच हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. 

कार्बनचा स्तर विक्रमीस्तरावर

वातावरणातील कार्बनवायूचे प्रमाण रेकोर्ड ब्रेक ४१७ पीपीएम इतके वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. उष्ण लहरींची सुरुवात २०१५ पासून झाली.

भारत सातव्या क्रमांकावर

जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसारही जगातील अतिधोकाग्रस्त १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर राहणार आहे. यादीत मोझांबिक अग्रक्रमावर असून त्यापाठोपाठ अनुक्रमे झिम्ब्वाम्बे, वाहामा, जपान, मलावी, अफगाणिस्तान, भारत, साऊथ सुदान, नायजर आणि बोलिवियाचा क्रमांक लागतो.

जनतेने सावध असले पाहिजे
हवामानातील बदलाने यापूर्वीच धोक्याची सूचना दिली आहे. दिवसाचे आणि रात्रीचे तापमान व उष्ण लहरीचे प्रमाण वाढणार असल्याने जनतेने सावध असले पाहिजे. 
- प्रा. सुरेश चोपणे,
अध्यक्ष, ग्रिन प्लॅनेट

सूर्य तळपू लागला

पावसाळी वातावरण ओसरताच पुन्हा सूर्य तळपू लागला आहे. विदर्भात सर्वदूर पुन्हा उन्हाच्या झळांची तीव्रता जाणवू लागली आहे. रविवारी नागपूरचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवसांत उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याचा इशारा दिला असून, तापमानवाढीमुळे नागरिकांना उकाडा सोसावा लागणार आहे.

विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४२.६ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. मार्च महिन्याच्या मध्यात पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. त्यानंतर जवळपास आठवडाभर अवकाळी पावसाने विदर्भात थैमान घातले. त्यामुळे तापमानातही मोठी घसरण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ढगाळ वातावरण ओसरताच उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.