मोठ्या बहिणीच्या प्रसंगावधाने लहान बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; ब्रह्मपुरीत गुन्हा दाखल

An attempt to abduct a girl in Brahmapuri failed
An attempt to abduct a girl in Brahmapuri failed
Updated on

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर)  : शिकवणीवर्गासाठी जात असलेल्या एका लहान मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न मोठ्या बहिणीने मोठ्या शिताफीने दाखविलेल्या प्रसंगावधानाने फसल्याची घटना ब्रह्मपुरी येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या पालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पटेलनगर परिसरात राहत असलेल्या दोन बहिणी दुपारच्या सुमारास सायकलने शिकवणी वर्गाला जात होत्या. दरम्यान रस्त्यातच मोठ्या बहिणीची पुस्तके सायकलवरून खाली पडली. त्यामुळे मोठी बहीण पुस्तके उचलण्यासाठी तेथेच थांबली, तर लहान बहीण समोर निघाली. त्याचवेळेस एक व्यक्ती तिथे आली. त्याने पुस्तक उचलत असलेल्या बहिणीला नाव विचारले. मात्र, ती पुस्तक उचलण्यात गुंग होती. त्यामुळे ती व्यक्ती समोर निघाली.

बिस्कीट देण्याचा प्रयत्न

थोड्या अंतरावर लहान बहीण होती. तिला त्याने बिस्कीट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिला. तेव्हा खिशातून त्याने रुमाल काढून लहान मुलीस बेशुद्ध केले. हा प्रकार मोठ्या बहिणीच्या लक्षात आला. तिने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे रस्त्याने जात असलेली एक व्यक्ती मदतीसाठी धावून आली. त्याने लहान मुलीस बेशुद्ध करणाऱ्या व्यक्तीवर दगड भिरकावला.

त्यामुळे लहान बहिणीस तेथेच ठेवून ती व्यक्ती पसार झाली. दरम्यान त्या मुलीचे पालकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

काही वर्षांपूर्वी मुलीचे अपहरण

काही वर्षांपूर्वी ख्रिस्तानंद शाळेची सुटी झाल्यानंतर एका छोट्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी एका संशयितास शहरातील दोन पत्रकारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सहकारी मुलीला घेऊन कुठे गेला याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडून मुलीची सुटका केली होती.
 

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.