Yavatmal Crime : अलार्म वाजल्याने फसला एटीएम फोडण्याचा प्रयत्न; आरोपी सीसीटीव्हीत कैद; पोलिसांचा तपास सुरू

केळापूर तालुक्यातील करंजी येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न चौघे करीत होते. यावेळी अलार्म वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. ही घटना बुधवारी पहाटे (ता.३१) साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
attempt to break ATM goes wrong accused captured on CCTV police investigating yavatmal crime
attempt to break ATM goes wrong accused captured on CCTV police investigating yavatmal crimesakal
Updated on

यवतमाळ : केळापूर तालुक्यातील करंजी येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न चौघे करीत होते. यावेळी अलार्म वाजल्याने चोरट्यांनी पळ काढला. ही घटना बुधवारी पहाटे (ता.३१) साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

या प्रकरणी मनोज जाधव (वय ४४, रा. किन्हाळ, ता. कळंब) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, केळापूर तालुक्यातील करंजी येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता चार अनोळखी व्यक्तींनी एटीएम मशिनच्या उजव्या बाजूने कटर मारून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

attempt to break ATM goes wrong accused captured on CCTV police investigating yavatmal crime
Yavatmal : दारू पिऊन निजला अन् कायमचाच गेला

त्यावेळी ई सर्विलंन्सचा अलार्म वाजल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, ई सर्विलंन्सच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मनोज जाधव यांनी पांढरकवडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.