Yavatmal : शेतकरी पुत्राने बनवली स्वयंचलित कार; दीडशे रुपयात धावणार तीनशे किमी

आजकालचे सुशिक्षित युवक आपल्या संकल्पनेतून नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यामध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत.
Sonic Car
Sonic CarSakal
Updated on
Summary

आजकालचे सुशिक्षित युवक आपल्या संकल्पनेतून नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यामध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत.

वणी (जि. यवतमाळ) : आजकालचे सुशिक्षित युवक आपल्या संकल्पनेतून नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यामध्ये अनेक तरूण यशस्वी झाले आहेत. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती पहाता सध्या शेतकर्‍यांसाठी नवनवीन प्रयोग केल्या जात आहेत. अशाच वणीतील एका उच्चशिक्षित शेतकरीपुत्राने अवघ्या दीडशे रूपयांत अडीचशे ते तिनशे किलोमिटरचा प्रवास करणारी स्वयंचलीत ‘सोनिक कार‘तयार केली आहे.

हर्षल नक्षिणे असे या उच्चशिक्षित व प्रयोगशील युवकाचे नाव आहे. तो सर्वसाधारण कुटुंबाशी निगडीत असून त्याने एम. टेकची पदवी प्राप्त केली आहे. काहीतरी नवीन करण्याचा ध्यास उराशी बाळगून त्याने कमी खर्चात धावणारी कार निर्माण करण्याचा निर्णय घेतला. वणी परिसर हा प्रदुषणग्रस्त म्हणून ओळखल्या जातो. त्यात डिझेल व पेट्रोलवर धावणारी वाहने अधिक भर घालत आहे. त्यामुळे प्रदुषण विरहीत कार तयार करण्याचा त्याने निश्‍चय केला.

हर्षलचे स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची अशी सुपरकार असली पाहिजे. जी शून्य प्रदूषणासह स्वत: धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणार्‍या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरून, अपघात आणि मानवी चुका कमी होईल, अशी कार हवी होती. म्हणूनच वणी येथील हर्षल नामक युवकाने आपल्या कुणाल आसुटकर या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषणमुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे.

हर्षलने एक कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत शिकणार्‍या आपल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम त्याने सुरु केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हिंगसाठी संगणक तयार केले आहे. ड्रायव्हरविना ही कार चालणार आहे. आपल्याला ज्या मार्गाने व ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग निवडा, त्या ठिकाणी ही कार पोहचणार आहे.

एक लिटर हायट्रोजनमध्ये (किंमत 150 रूपये) 250 ते 300 किलो मिटर ही कार धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलवर चालणार्‍या वाहनांपासून सुटका होणार आहे. या कारने कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही. ही सुपरकार तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग वणीतच तयार केले आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आल्या.

प्रायोगिक तत्वावर ही कार तयार केली असून, त्यासाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हिंग व हायड्रोजन फ्यूल सिंसटमचे पेटेंट नोंदणी केली आहे. 100 कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. सामान्य लोकांना ही कार परवडेल, यासाठी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती हर्षलने दिली.

लहानपणापासूनच प्रदुषण विरहित कार बनविण्याचे माझे स्वप्न होते. यातूनच मी हायड्रोजनवर चालणारी गाडी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. तब्बल एक वर्षाच्या कालावधीत ही कार तयार करण्यात आली. या कारबाबत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता त्यांनी या कारच्या उत्पादनाकरीता मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

- हर्षल नक्षिणे, प्रयोगशिल युवक, वणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.