लाज वाटायला हवी, 10 हजाराचं तरी काम करा; अधिकाऱ्यावर बच्चू कडू संतापले

'गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला, तो मेला तरी चालेल'
bacchu kadu latest news
bacchu kadu latest newsgoogle
Updated on
Summary

'गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला, तो मेला तरी चालेल'

Summary

राज्यमंत्री बच्चू कडू हे सतत त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्तेत असतात. त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे राजकीय वर्तुळातही त्यांची चर्चा असते. दरम्यान, त्यांचा आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात बच्चू कडू एका प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी करताना दिसत आहे. सध्या हो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून यावर कमेंट्सही येत आहेत.

व्हिडिओत काय म्हणाले बच्चू कडू ?

राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून बच्चू कडूंनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. ते म्हणतात, फुकटचा पैसा खायला पाहिजे तुम्हाला. "तुम्हाला लाथच मारायला पाहिजे. लाज वाटली पाहिजे थोडी. ३५ हजारापैकी किमान १० हजाराचं तर काम करा. रोजगार हमी सांगतो, नालायका. गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला. तो मेला तरी चालेल. नको होऊ दे १० वर्ष घर. तुमची काहीच तयारी नाही. कोणत्या वर्षात योजना सुरू केली तुम्ही? अशा शब्दांत बच्चू कडू अधिकाऱ्याला सूनावताना दिसत आहे.

bacchu kadu latest news
नवनीत राणा प्रकरणी दिल्लीत हालचालींना वेग, महाराष्ट्रातील ४ बडे अधिकारी रडारवर

पुढे म्हणतात, त्या दलितांवर का अन्याय करताय? खरंतर तुमच्यावर तर अॅट्रॉसिटीचाच गुन्हा दाखल करायला पाहिजे. रमाईमध्ये सरकारला टार्गेट पूर्ण करता येत नाही. एससी समाजातील लोकांसाठी ही रमाई योजना आहे. त्यांच्या योजनेचे प्रस्ताव वेगळे काढून त्याच्यासाठी वेगळे अर्ज मागवून घ्या. ते लगेच मंजूर होतील. त्यासाठी केंद्रसरकारच्या परवानगीची गरज नसते. कर्जाचा प्रस्ताव पाठवला की त्याला दोन दिवसात मंजुरी मिळते, समाज कल्याणचं कोण पाहातं हे माहिती नाही? अशी प्रश्नांनी बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्याचे दिसत आहे.

दरम्यान, भुसावळमधील प्रांत कार्यालयात बच्चू कडू यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने गोरगरीबांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची विचारणा केली पण त्या योजनांची अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि ते संतापले. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्याना धारेवर धरलं आहे.

bacchu kadu latest news
मान्सूनचा लपंडाव सुरुच; पुन्हा तारीख बदलली, 'या' दिवशी महाराष्ट्रात धडकणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.