यवतमाळ : कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. शहरीच नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातातही मोबाइल आले आहेत. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर जात आहे. इंटरनेटची सुविधा मिळाल्याने विद्यार्थी आता पोर्नोग्राफीच्या जाळ्यात अडकत चालले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.
आजकाल जवळपास सर्वच मुला-मुलींना ‘लैंगिकता’ या विषयातली पहिली माहिती ही पोर्नोग्राफी किंवा तत्सम डिजिटल माध्यमातून मिळत आहे. इंटरनेट वेगवान झाले आहे. त्यामुळे पॉर्नही अगदी सहजासहजी, थेट हातात मिळू लागले आहे. सॉफ्ट पॉर्नच्या रूपातही अनेक गोष्टी उपलब्ध असतात. ते पाहून बऱ्याच जणांना स्वत:बद्दल आणि एकूणच लैंगिक गोष्टींबद्दल प्रश्न पडू लागतात. काहींच्या मनात (खासकरून मुलींच्या) लैंगिकतेबद्दल भीती निर्माण झालेली असते. तरुण मुलांचे काही गैरसमज होतात. त्यातून त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळाल्याने डोक्यातला संभ्रम वाढतो आणि चुकीच्या गोष्टी मनात घर करून बसतात.
या संदर्भात कुणाशीच बोलता येत नसल्याने अनेकजण कोंडमारा तरी सहन करतात किंवा अजून माहिती मिळवण्याच्या नादात इंटरनेटवर चुकीची माहितीच मिळवत राहतात. एखाद्या गोष्टीची चटक लागते तशी पॉर्नचीही लागते. पॉर्नमुळे मानसिक आरोग्याला धोका पोहोचतो असे छातीठोकपणे जरी म्हणता येत नसले तरी त्याची दाट शक्यता आहे. पॉर्न पाहायची चटक लागली तर कौटुंबिक, सामाजिक आणि वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तेरा ते वीस वर्षांची मुलं-मुली पॉर्न पाहतात. पालकांनी त्यांच्याशी बोलून धोके समजावून सांगणे आवश्यक आहे.
काय म्हणतो भारतीय कायदा
अश्लील फीत तयार करणे आणि विकणे गुन्हा आहे. २० वर्षांखालील मुला-मुलींना अश्लील चित्रफीत विकणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीने अश्लील चित्र दुसऱ्यांना दाखवणे, देणे, विकणे, पाठवणे म्हणजे फॉरवर्ड करणेही गुन्हा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.