Bail pola : आकर्षक लाकडी व पितळेच्या नंदीची क्रेझ

पूर्व विदर्भात तान्हा पोळ्याची २१७ वर्षांची अस्सल ग्रामीण परंपरा
bail pola
bail pola sakal
Updated on

नागपूर - नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने पोळा हा सण साजरा केला जातो. राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो, अगदी त्याचप्रकारे पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या २१७ वर्षांपासून आजही सुरू आहे.

नागपूरसह पूर्व विदर्भात ‘तान्हा’ पोळ्याची लगबग सुरू झाली आहे. या दिवशी लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते. नागपूरच्या लकडगंज टीबर मार्केटमध्ये एक हजार ते अडीच लाख रुपये किमतीचे नंदी विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पूर्व विदर्भात पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा भराविला जातो. त्यासाठी विविध लाकडांच्या जातीपासून सुबक आणि आकर्षक नंदी बैल वर्षभर तयार केले जातात.

शेकडो कुटुंबाला मिळतो रोजगार

विशेष म्हणजे लाकडी बैलांची विक्री करून, आज शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. यावर्षी नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. तीनशे ते अडीच लाख रुपये किमतीचे बैल विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. सोबतच विविध धातूंचे नंदीही विक्रीकरिता उपलब्ध झाले आहेत. धातूंच्या नंदी बैलांना देखभाल खर्चदेखील नसल्याने ग्राहक आता याकडेही वळू लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० टक्क्यांनी मागणी वाढली असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

bail pola
Beed News : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकाची दुरवस्था

आज आवतन घ्या, उद्या जेवायला या

शेतकऱ्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणाऱ्या बैलांची पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजा करून त्याने वर्षभर केलेल्या कष्टाची कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांनी गाणी गात बैलांचे खांदे तूप किंवा तेल व हळद लावून शेकले. ‘आज आवतन घ्या, उद्या जेवायला या’ अशा शब्दात बैलांना पोळ्याचे निमंत्रणही दिले.

bail pola
Jalna News : जवखेडा पाटीवर अज्ञातांकडून परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक, जाळण्याचा प्रयत्न

अडीच हजारापर्यंत लाकडी बैल

लाकडी नंदीची विक्री अगदी दणक्यात सुरू झाली आहे. पोळ्याच्या पाडव्याला साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्यासाठी लाकडी नंदी बैलांचे बाजार आता सजायला सुरुवात झाली आहे. सर्वात लहान नंदीची किंमत ३०० रुपये आहे, तर सध्या सर्वात मोठा नंदी हा अडीच लाख रुपयात विक्रीसाठी तयार आहे. महत्त्वाचे म्हणजे नंदी तयार होत असलेल्या ठिकाणी ते विकत घेण्यासाठी हौशी नागपूरकर गर्दी करू लागले आहेत. नागपूर शहरात सुमारे शंभर कुटुंब वर्षभर नंदी तयार करतात.

bail pola
Raigad News : माणगाव बाजारपेठेत रस्‍ते मोकळे!

७० किलोचा पितळेचा नंदी

लाकडासोबतच पितळेच्या नंदीचीही मागणी वाढू लागली आहे. दोन ते तीन महिन्यांपासूनच नंदी बनविण्यापासून त्याच्या साज-सजावटीवर कार्य सुरू होते. पितळेचे नंदी बंगळुरूवरून येतात. यात कोणत्याही प्रकारच्या तुटण्याचा-फुटण्याचा धोका नसतो. पितळेचे नंदी पोळ्यातील शोभा वाढविण्यासह मंदिर किंवा ड्रॉइंग रूममध्येही ठेवता येतात. पितळेच्या नंदीची किंमत १,१०० ते १ लाख रुपयांपर्यंत आहे. सर्वात मोठ्या नंदीचे वजन ७० किलो असून यात लागणारी फ्रेम जोडल्यास १०५ किलो वजन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.