Balapur Incident : जन्मदात्यानेच फेकले दोन मुलींना नदीत...घरगुती वादातून केले कृत्य; हरवल्याचा केला बनाव

Balapur Incident : घरगुती वादातून जन्मदात्या बापाने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना नदीत फेकले, ज्यात त्यांचा अंत झाला. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
Balapur Father throws two daughters into river
Balapur Incidentsakal
Updated on

बाळापूर : घरगुती वादातून एका जन्मदात्यानेच आपल्या दोन अल्पवयीन लेकींना बाळापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील भिकूंड नदीत फेकून दिले. त्यात दोन्ही निरागस मुलींचा करूण अंत झाला. ही घटना ता. ५ ऑक्टोबर रोजी उघड झाली.

पोलिसांनी आरोपी बापाला, शेख हारुण शेख साबीर (वय ३६) याला अटक केली. आलीया परवीन शेख हारुण (वय ९) व सदाफ परवीन शेख हारुण (वय ७) असे मृत मुलींची नावे असून, दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपी बापाला मंगळवार (ता. ८) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही घटना शनिवारी (ता. ५) रोजी सायंकाळी उघडकीस आली होती. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने शनिवारी मध्यरात्री हे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.मूळचा कदमापूर येथील रहिवासी असलेला शेख हारुण हा खामगाव पोलिस स्टेशन हद्दीतील लाखनवाडा येथे वास्तव्यास आहे. याला चार मुली असून, यापैकी आलीया व सदाफ या दोन मुलींना आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी तो अटाळी येथे शनिवारी (ता. ५) घेऊन गेला होता.

अटाळी येथून तो दोन मुलींसह सायंकाळच्या सुमारास बाळापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील भिकुंड नदीच्या पुलावर आला आणि अंधाराचा फायदा घेत त्या क्रूर पित्याने दोन्ही मुलींना पाण्यात फेकून दिले.

मुली हरवल्याचा केला बनाव

निर्दयी बापाने दोन्ही मुलींना नदीच्या खोल पाण्यात फेकून खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन गाठत मुली हरवल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांच्या चौकशीपुढे हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मुलींना नदीत फेकल्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.