अचलपूर : ‘आगामी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीचा होईल,’ असे निकालाच्या पूर्वीच घोषित करून राज्याच्या राजकारणात सनसनी निर्माण करणारे ‘प्रहार’चे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना अचलपूरमधून प्रवीण तायडे या भाजपच्या अतिशय नवख्या उमेदवाराने १२ हजार मतांनी धूळ चारली. कडूंच्या या पराभवामुळे राज्याच्या राजकारणातील तिसऱ्या आघाडीचा फुगा फुटला.