बोगस घरकुल प्रकरणात तत्कालीन बीडीओ व लेखापालही सहभागी

Home
Home
Updated on

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील कोलद ग्रामपंचायत अंतर्गत बोगस घरकुल दाखवून शासनाची फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यात तत्कालीन गटविकास अधिकारी आणि लेखापाल दोषी आढळले. या दोघांना वर्षभरानंतर तपासाअंती तामगाव पोलिसांनी आरोपी केल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हा दाखल होण्याअगोदरच सेवानिवृत्त गटविकास अधिकारी डॉ. डी. आर. हिरोळे यांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता हे विशेष !

या दोघांनाही 7 ऑक्टोबर 2019 रोजी कागदोपत्री अटक करण्यात आली. अजूनही या प्रकरणाचे धागेदोरे बरेच लांब लचक असल्याने पोलिसांनी कसून तपास केल्यास मुंबई पर्यंत साखळी या प्रकरणाला दोषी असल्याचे उघड होऊ शकते. तामगाव पोलिसात 21 डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन कार्यरत गटविकास अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी लेखी फिर्याद दिली होती. 

यादीत नाव नसताना घेतले घरकुल
फिर्यादीमध्ये कोलद येथे ग्रामपंचायत ऑपरेटर पदावरील अनिल नृपनारायन याने प्रपत्र ब च्या घरकुल यादीत नाव नसताना स्वतःचे आणि मयत आजी मोंढाबाई फकिरा बोदडे असे नावे लाभार्थी म्हणून समाविष्ट केले होते. त्या बांधकामाची पाहणी व खात्री न करताच ग्रामीण आवासचे अभियंता गोपाल खोदले यांनी 30 मे 2018 ते 31 जुलै 2018 या काळात शासकीय प्रक्रिया करून दोन्ही घरकुलचे पूर्ण पैसे 2 लाख 40 हजार अनिलने दिलेल्या बँक खात्यात जमा केले. यासाठी कुठलीही शासकीय परवानगी घेतली नाही. 

पोलिस तपासात बीडीओही आरोपी
पदाचा दुरुपयोग करून अपहार केल्याची बाब उघड होताच अनिल नृपनारायन याने टप्प्या टप्प्याने रक्कम शासन जमा केली. अशा फिर्याद वरून 21 डिसेंबर 2018 मध्ये तामगाव पोलिसांनी ऑपरेटर अनिल नृपनारायन व अभियंता गोपाल खोदले यांचे विरुद्ध कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हे दाखल केले व या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांना वर्षभरानंतर तत्कालीन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी डॉ. डी. आर. हिरोळे यांचा निष्काळजीपणा दिसून आला. तसेच लेखापाल ही या प्रकरणात दोषी असल्याचे निष्पन्न झाले.

जुळलेली होती साखळी
गटविकास हिरोळे व लेखापाल सोळंके यांनाही या प्रकरणी 7 ऑक्टोबर 2019 रोजी आरोपी करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोउपनिरीक्षक विखे, सहकारी शिवा कायंदे यांनी दिली. यातील आरोपी अनिल नृपनारायन हा ग्रा. पं. व पंचायत समिती घरकुलमध्ये ऑपरेटर म्हणून कामे करीत होता. यामध्ये गटविकास अधिकारी, अभियंता याची साखळी जुळलेली होती. 

ऑपरेटरचे कारस्थान
तत्कालीन गटविकास अधिकारी हिरोळे याची लाँगिन आयडी (डीएससी) ऑपरेटर अनिलच्या ताब्यात दिलेली होती. अनिलने याचा फायदा घेऊन मयत आजी आणि स्वतःचे नाव शासनाच्या प्रपत्र ब यादीत नसतांना दोन घरकुलची रक्कम उकळण्याचा प्रताप केला. यामध्ये ज्या सिस्टमद्वारा पैसे लाभार्थीच्या खात्यात हप्त्या हप्त्याने जमा केले जातात, त्या प्रक्रियामध्ये ही या प्रकरणात दिरंगाई करण्यात आली म्हणूनच बांधकाम नसतानाही पूर्ण रक्कम जमा झाली. 

प्रकरण रफा-दफा करण्यासाठी सर्वच लागले कामाला
संग्रामपूर पंचायत समिती, बुलडाणा ग्रामविकास यंत्रणा, बेलापूर अशी यंत्रणा असतानाही हा अपहार झाला. ही बाब ग्रामपंचायतने तक्रारीने उघड केली. म्हणून प्रकरण तातडीने रफा दफा करण्यासाठी यातील सर्वच जण कामाला लागल्याचे ही त्यावेळी दिसून आले. आरोपी अनिलकडून तातडीने रक्कम शासन जमा करणे सुरू झाले. तक्रार असल्याने जिल्हा ग्रामीण यंत्रणेने गटविकास अधिकारी बोंद्रे याना अहवाल मागितला होता. त्या अहवालाच्या आधारे गट विकास अधिकारी बोंद्रे यांना सदर अपहारास कारणीभूत त्या दोघाविरुद्ध पोलिस तक्रार देण्याचे आदेश देण्यात आला होता. 

वर्षभरानंतर आरोपींची संख्या चार
त्याच गुन्ह्यात वर्षभरानंतर तपासात सेवानिवृत्त गटविकास अधिकारी डॉ. हिरोळे आणि लेखापाल सोळंके दोषी आढळले. म्हणून या दोघांना ही या प्रकरणी आरोपी करण्यात आले असून, आता यात एकूण चार आरोपी संख्या झाली आहे. पोलिस यंत्रणेने कसून तपास केल्यास अजूनही आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.