लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीसह भावाला मारहाण; उपचारादरम्यान भावाचा मृत्यू

लग्नाला नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने प्रेयसीसह तिच्या भावाला भर रस्त्यात जबर मारहाण केली.
Crime News
Crime Newssakal
Updated on
Summary

लग्नाला नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने प्रेयसीसह तिच्या भावाला भर रस्त्यात जबर मारहाण केली.

समुद्रपूर (जि. वर्धा) - लग्नाला नकार दिल्याने माथेफिरू प्रियकराने प्रेयसीसह तिच्या भावाला भर रस्त्यात जबर मारहाण केली. जखमी बहीणभावास सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी समुद्रपूर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. कपिल आखाडे आणि त्याचा मित्र वैभव लाजूरकर (रा. हिंगणघाट) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा येथील मुलगी व तिचा भाऊ समुद्रपूर येथे एका महाविद्यालयात ११ जुलैला परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा आटोपल्यावर दोघेही दुचाकीने वर्ध्येकडे निघाले. दरम्यान, समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव चौरस्त्यापुढील वाघाडी नदीजवळ प्रियकर कपिल आखाडे आणि त्याचा मित्र वैभव लाजूरकर यांनी बहीणभावाची दुचाकी थांबविली. युवतीला ‘तू माझ्याशी लग्न का करीत नाही’ असे म्हणत मारायला लागला.

भावालाही लोखंडी रॉडने मारहाण केली. गंभीर जखमी बहीणभावास रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, भावाचा मृत्यू झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांच्या सुपूर्द करण्यात आला होता. समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रश्नांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक राम खोत यांनी आरोपीस अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.