सध्या आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला आहे. त्या ज्वरातून सुरू असलेल्या सामन्यांवर सट्टा लावण्यात येत आहे.
वर्धा - सध्या आयपीएलचा (IPL) ज्वर चांगलाच चढला आहे. त्या ज्वरातून सुरू असलेल्या सामन्यांवर सट्टा (Betting) लावण्यात येत आहे. यातच नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या २०-२० क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्ट्यावर (Online Betting) पोलिसांनी (Police) छापा (Raid) मारला. यात सहा जुगाऱ्यांना रंगेहात अटक (Arrested) केली. यात २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सालोड शिवारात असलेल्या फार्म हाऊसवर मंगळवारी (ता. तीन) सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईन क्रिकेट बुकींचे धाबे दणाणले आहे. होमेश्वर वसंत ठमेकर (५०) रा. रामनगर, प्रवेश पुडीलाल चिलेवार (४२) रा. नाचणगाव, अशोक भगवंत ढोबाळे (३२) रा. पुलगाव, गिरीश नामदेव क्षीरसागर (३१) रा. चंद्रपूर, दिनेश नागदेवे (२९) रा. दयालनगर, अविन प्रवीण गेडाम (३०) रा. पुलगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी पोलिसांनी दिली.
सध्या आयपीएल २०-२० क्रिकेट सामने सुरू असल्याने सट्टा व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात तेजी आलेली आहे. मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब तसेच आदी संघातील खेळाडूंसह संपूर्ण सामना कोण जिंकेल कोण हारेल, यावरही मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टा लावण्यात येतो आहे. सालोड शिवारात होमेश्वर ठमेकर यांचा फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसवर गत दोन महिन्यांपासून आयपीएलवर सट्टा लावण्याचा प्रकार सुरू होता.
याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर छापा मारला. यात सहा जुगारी मोबाईल अॅपच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना रंगेहात मिळून आले. खोलीत लागून असलेल्या टीव्ही स्क्रीनवरील क्रिकेट मॅचवर ऑनलाइन मोबाईल अॅपद्वारा पैशाची बाजी मोबाईलवर लावताना मिळून आले.
पोलिसांच्या जप्तीत रोख नाममात्रच
पोलिसांनी सहाही जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून टिव्हीचे ३ संच, ३६ मोबाईल, ३ रेकॉर्डर संच, १ डोंगल, २ लॅपटॉप, १ इनव्हरटर, १ चारचाकी वाहन, ३ दुचाकी, डायरी व इतर नोंदणी केलेले साहित्य आणि ३ हजार ५०० रुपये रोख असा एकूण २६ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.