Bhandara Gondia Lok Sabha Election : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीची चर्चा सुरु आहे. यादरम्यान आता भाजप आणि काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवल्याने येथील लढत चौरंगी होण्याची शक्यता बळावली आहे. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र शनिवारी (ता. 30) सायंकाळी स्पष्ट झाले आहे.
या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुनील मेंढे (Sunil Mendhe) , महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रारंभी भाजप आणि काँग्रेस अशी थेट वाटणारी लढत आता बसपाचे संजय कुंभलकर आणि अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांच्या उमेदवारीमुळे रंगतदार झाली आहे. यासोबतच, वंचित बहुजन आघाडीचाही तेवढाच विचार करावा लागणार आहे. बसपाकडून संजय कुंभलकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून संजय केवट रिंगणात आहेत.
भाजपने विद्यमान खासदारांना तिकीट देऊन परिचित चेहरा दिला आहे. तर काँग्रेसने डॉ. पडोळे यांच्या रूपाने तरुण आणि नवा चेहरा पुढे केला आहे. त्यांच्यासह 18 उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. नामांकनाच्या दिवशी शक्तिप्रदर्शनात भाजपचे सुनील मेंढे यांच्या तुलनेत काँग्रेसचे डॉ. पडोळे हे नव्या चेहऱ्याने उमेदवार कुठेही मागे पडलेले दिसले नाही. त्यामुळे दुरंगी लढत होणार, अशी चर्चा रंगली असतानाच बसपाने संजय कुंभलकर यांच्या रूपाने तेली समाजातील चेहरा पुढे केला.
नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमदत्त करंजेकर आणि मुनिश्वर बोरकर यांनी माघार घेतली. आता बोरकर कुंभलकरांच्या मंचावर पोहोचले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेही संजय केवट या तरुणाला उमेदवारी देऊन नवा चेहरा पुढे केला आहे. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असणारे माजी आमदार सेवक वाघाये यांनीही काँग्रेसविरुद्ध दंड थोपटून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे किती नुकसान होणार, याची चर्चा आता गावखेड्यांत रंगायला लागली आहे.
दूसरीकडे या बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भर उन्हाळ्यात ताप चढला आहे. या बंडखोरांनी प्रचारात आपल्याला झोकून दिल्याने यंदाच्या निवडणुकीत या बंडखोरांमुळे दोन्ही पक्षांची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. आता ही लढत चौरंगी ठरल्याने दोघांच्या लढाईत तिसऱ्याचा फायदा होणार तर नाही ना, अशा चर्चा सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.