भंडारा: राष्ट्रीय महामार्गावरून ओडिशा राज्यातून नाशिककडे गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून आज शुक्रवारी पोलिसांनी शाेध घेऊन महिंद्रा एक्सयूव्ही-५०० वाहनातून १६७ किलो गांजा जप्त केला. गांजा व वाहनाची एकूण किंमत ४५ लाख सहा हजार ५०० रुपये आहे. यात चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.