गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सततच्या पावसामुळे अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. अशातच येथील एका महिलेला प्रसूतीनंतर रक्ताची नितांत गरज होती. ही माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी थेट हेलिकाॅप्टरने तिच्यासाठी रक्ताची पिशवी पाठवली.
रविवार (ता. ८) पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत सोमवार (ता. ११) पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली. मंतोशी गजेंद्र चौधरी (वय २४)रा.आरेवाडा ता. भामरागड) असे महिलेचे नाव आहे.