बाभूळगाव (जि. यवतमाळ) : तंत्रज्ञानाच्या युगात अनेक उपयोगी तांत्रिक साधनाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र, काही हौशी तरुणांकडून याचा दुरुपयोग होत असल्याने नाहक यात आपला जीव गमावत आहेत. सेल्फीच्या नादात अनेक मृत्यूच्या घटना घडत असताना बाभूळगाव तालुक्यातील अशीच एक घटना आज मंगळवारी (ता.30) उघडकीस आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात येणाऱ्या भातकुली येथील तरूण तेजस लोखंडे (वय19) याने सेल्फीच्या नादात आपला जीव गमविला. ही घटना रविवारी (ता.28) दुपारच्या सुमारास घडली. मृतदेह आज पाण्यावर तरंगताना आढळून आला. भातकुली येथील तेजस सुरेश लोखंडे (वय 19) हा त्याच्या काही मित्रांसोबत रविवारी बेंबळा धरणाच्या परिसरात फिरायला गेला होता.
दरम्यान, तेजसने धरणाच्या पाण्यात आंघोळ करण्याची ईच्छा व्यक्त केली व तो अंगातील कपडे काढून धरणाच्या पाण्याजवळ गेला. तिथे तो मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरून तो थेट धरणाच्या पाण्यात बुडाला. याबाबत त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी घरच्यांना माहिती दिली. त्यावरून तेजसची आई जयमाला सुरेश लोखंडे यांनी बाभूळगाव पोलिस स्टेशन गाठून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
भोई बांधवांकडून तेजसचा शोध घेण्यात आला मात्र मृतकाचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी शोधमोहीम करण्यात आली यातही ते अपयशी ठरले. आज तिसऱ्या दिवशी (ता.30) सकाळी तेजसचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृताची आई व नातेवाइकांकडून ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामिण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी जयमाला सुरेश लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांचे मार्गदर्शनात जमादार काशिनाथ राठोड करीत आहे.
सुरक्षा रक्षकाकडून होतेय दुर्लक्ष
धरण परिसरात नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षकाच्या दुर्लक्षीतपणाच्या धोरणामुळे अशा घटना घडत असल्याचे नागरिकांकडून ओरड आहे. दूरवरून धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना नियमाचा व सुरक्षीतेतेचा भान दाखविण्याचे काम सुरक्षा रक्षकाचे आहे. मग अशी घटना का घडली? असा प्रश्न विचारल्या जात आहे. वरिष्ठांनी या गंभीर प्रश्नी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.