वडकी (जि. यवतमाळ) : जय जवान जय किसान ही कृषी संस्कृती असणाऱ्या देशाच्या राजधानीमध्ये आज शेतकरी व देशाचे जवान समोरासमोर येण्याचा दुर्देवी प्रकार देशात निर्माण झाला आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला एक संस्कार मानण्यात आले आहे.अशा वेळी विवाहाच्या मंगल संस्कारातून कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील नववधूने एक धाडसी निर्णय घेतला.कृषी संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या ट्रॅक्टर वर स्व|र होतं नववधू चक्क वर मंडपी दाखल झाली.
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी असलेले पंढरीनाथ दुर्गे यांची कन्या कुमारी प्रणाली हीचा विवाह दिनांक १६ February रोजी चंद्रपूर येथील वर निकेश ज्ञानेश्वर झोटिंग चंद्रपूर या मुलाशी ठरला, या लग्नाची विशेषता म्हणजे दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत नववधू चक्क ट्रॅक्टर चालवत मंडप स्थळी पोहचली.
हेही वाचा - 'राज्यपाल भाजप कार्यकर्ते अन् राजभवन पक्षाचे...
आपण नेहमी पाहत असतो की वर व वरांकडील मंडळी ही वाजत गाजत वधु मंडपी येतात परंतु या सर्व गोष्टी ला फाटा देत प्रणाली हिने सामाजिक संदेश देत ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला शेतकऱ्याची कन्या म्हणुन अनोखा पाठिंबा दिला. सद्या राळेगाव शहरात या वेगळ्या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.