Buldana : कापसाचेे भरघोस उत्‍पादन, दर मात्र कमी

गतवर्षी मिळाला होता विक्रमी भाव शेतकरी दरवाढीच्‍या प्रतीक्षेत
 farmer cottonprice
farmer cottonpricesakal
Updated on

मलकापूर : मागील वर्षी विक्रमी बारा ते तेरा हजार रुपये प्रतिक्‍विंटल मिळालेल्‍या दरामुळे तालुका परिसरात यावर्षी देखील कपाशीची मोठी लागवड झाली. कापसाचे भरघोस उत्‍पादन देखील झाले परंतू, दरवाढ होत नसल्‍याने बहुतांशी शेतकऱ्यांनी कपाशी घरातच साठवून ठेवली आहे. दरम्‍यान, कापूस विक्रीस येत नसल्‍याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे तर शेतकरी दरवाढीच्‍या प्रतीक्षेत आहेत.

मागील वर्षी कपाशीला मिळालेला उच्चांकी भावामुळे शेतकऱ्यांनी तालुका परिसरात खरीप हंगाम बावीस हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. हंगामाच्‍या सुुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्‍याने कपाशी जोमात होती परंतू, जुलै-ऑगस्‍ट या दोन्‍ही महिन्‍यामध्ये पावसाने लपंडाव केल्‍याने कपाशीचे नुकसान झाले. तर परतीच्‍या झालेल्‍या सततच्‍या रिपरिप पावसाने बोंडे सडली. पाने पिवळी पडून नुकसान झाले होते,

असे असले तरी मशागतीच्‍या जोरावर शेतकऱ्यांनी स्‍वतःच्‍या लेकरांप्रमाणे कपाशी सांभाळली. सध्या सर्वच शेतकऱ्यांनी कपाशीची वेचणी करुन घरी साठवणूक केली आहे. परंतू, जानेवारी महिना संपत आला तरी देखील अपेक्षित दरवाढ होत नसल्‍याने शेतकऱ्यांनी कपाशीची विक्री थांबविली आहे. परिणामी हमाली करणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शासकीय मदत कधी ?

पावसाने दिलेला खंड आणि परतीच्‍या तडाख्यात सापडल्‍याने कपाशीची मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाने चारशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली. याची कागदपत्रे तलाठ्यांमार्फत घेण्यात आली परंतू, अद्याप शासकीय मदत मिळालेली नसल्‍याने मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्‍थित केला जात आहे.

कापसाला भाव वाढत नसल्‍याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी घरातच ठेवलेली आहे. कापसाची आवक अल्‍पशा प्रमाणात असल्‍याने खरेदी केंद्रावर तासन्‌ तास ताटकळत बसावे लागत आहे. परिणामी हाताला काम मिळत नाही.

- अशोक भोजने, मजूर मलकापूर

गत वर्षी याच महिन्‍यामध्ये कापसाची विक्री केली होती. वाढीव दर मिळाल्‍याने यावर्षीही चांगला भाव मिळेल या आशेपोटी कापूस घरात ठेवलेला आहे. परंतू, दरवाढ होत नसल्‍याने निराशा पदरी पडत आहे. कपाशीला मोठा खर्च केलेला आहे.

- अमर जाधव, शेतकरी घिर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.