Buldana : पीक नुकसानीची तत्काळ मदत द्या

काँग्रेसचे मोताळा तहसीलदारांना निवेदन
Buldana
Buldana sakal
Updated on

मोताळा : तालुक्यातील बहुतांश भागात वादळी पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पीडित शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मोताळा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना मंगळवारी (ता. ४) निवेदनातून करण्यात आली आहे.

तालुक्यातील खामखेड, राजूर, मुर्ती, राहेरा, टाकळी, अंत्री, दाभा, वारुळी, वाघजाळ, नेहरूनगर, शिरवा, परडा, तरोडा, बोराखेडी, खरबडी, मोहेगाव यासह परिसरात वादळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, मका, केळीचे पीक शेतातच आडवे झाले असून, काढणीला आलेली सोयाबीन शेतशिवारात पाणी साचल्याने सडण्याची भीती आहे. इतरही शेतीपिकांची नासाडी झाली असून, शेतकर्‍यांच्या पशुधनाची हानी झाली आहे.

ऐन हंगामाच्या तोंडावर निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पीक नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, माजी जि.प. सदस्य जयश्रीताई अनिल खाकरे, डॉ. अनिस खान, प्रकाश बस्सी, श्रीकृष्ण खराटे, आबिद कुरेशी, एस.पी. बोराळे, सुकलाल पाटील, मिलींद अहीरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.