काय सांगता, संजय राठोड यांची कॉँगेस उपाध्यक्षपदी वर्णी

Buldana News Sanjay Rathore as Congress Vice President
Buldana News Sanjay Rathore as Congress Vice President
Updated on

बुलडाणाः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय राठोड हे मुळ बुलडाणा येथील असून ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागल्या पासून काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. २०१४ नंतर केंद्रासह अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. मात्र, २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथा पालथेनंतर महाराष्ट्रातील सत्तेत काँग्रेस सहभागी झाला. आता, काँग्रेसने पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय राठोड हे मुळ बुलडाणा येथील असून ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी बुलढाणा येथील काँग्रेसचे नेते संजय राठोड यांची निवड झाली आहे काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांचे कट्टर समर्थक म्हणून संजय राठोड ओळखली जातात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थिदशेपासून शिवाय या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती आजवर अनेक वेळा त्यांनी विधानसभेची उमेदवारी पक्षाकडे मागितली परंतु पक्षाने त्यांना आजवर संधी दिली नाही बंजारा समाजातील एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या पत्रकानुसार, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत व संसदीय मंडळावर आणखी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड व माजी आमदार जनार्दन चांदुरकर यांची देखील संसदीय बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून आणखी चौघांना स्थान देण्यात आलं आहे. यात नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड आणि चारुलता टोकस यांचा समावेश आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.