Buldana: बुलडाण्याची लालपरी झाली मालामाल! तीन महिन्यात दोन कोटींचा नफा; सवलत योजनांतून मिळाले ११ कोटी ७५ लाख

२६ कोटी ६३ लाखांचे उत्पन्न
Buldana: बुलडाण्याची लालपरी झाली मालामाल! तीन महिन्यात दोन कोटींचा नफा; सवलत योजनांतून मिळाले ११ कोटी ७५ लाख
Updated on

बुलडाणा: राज्य सरकारने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची घोषणा, ज्येष्ठ नागरिकांना घोषीत केलेली सवलत, आणि महिलांना अर्धा तिकीटाची सुविधा या नागरी उपयोगी घोषणाची एसटी विभागाकडून शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात आली.

याशिवाय विविध मार्गावर एसटी बसची वाहतूक करून बुलडाणा विभागाने दोन वर्ष नंतर पहिल्यांदा दोन कोटी ३ लाखांचा नफा मिळवत बुलडाण्याची कोट्याधीश झाली आहे.

मार्च महिन्यात लग्नसराई आणि परिक्षायामुळे एस टी च्या गर्दीच्या हंगामाला सुरुवात होते. महिलांना ५० टक्के सवलत तिकिटांमध्ये मिळाल्यावर शेतकाम करणाऱ्या महिलांपासून थेट नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा एसटी बसने प्रवासाला पसंती देत आहे.

Buldana: बुलडाण्याची लालपरी झाली मालामाल! तीन महिन्यात दोन कोटींचा नफा; सवलत योजनांतून मिळाले ११ कोटी ७५ लाख
Darshana Pawar Murder Case: बंगाल ते अंधेरी.. सततचा ट्रेन प्रवास अन् असा पकडला दर्शनाचा मारेकरी.. पोलिसांनी सांगितला थरार

यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पूर्वी एसटी बसची अवस्था आणि आर्थिक टंचाईमुळे एसटी महामंडळाची सेवेबाबत शंका उपस्थितीत करण्यात येत होती. मात्र, एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागाने केलेल्या नियोजनामुळे फेब्रुवारी ते जून या काळात उन्हाळी जादा बस चालविण्यात आलेल्या आहेत.

मागील मार्च महिन्यापासून नफ्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाने मे महिन्यात विक्रमी नफा मिळविला आहे.

तसेच ‘रेकॉर्ड ब्रेक’ वाहतूक करून भरीव उत्पन्नाचा आकडा गाठला आहे. विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ आगारातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही जबरदस्त कामगिरी बजावली आहे.

मार्च २०२३ पासून नफ्यात असलेल्या बुलढाणा विभागाचा नफ्याचा चढता आलेख कायम आहे. मार्च महिन्यात ७१.३९ लाख, एप्रिल मध्ये १.४४ कोटीचा नफा मिळाला.

मे महिन्यात नफ्याचा हा आकडा तब्बल २ कोटी ३ लाख ८२ हजार वर गेला. यामुळे जूनमध्येही ही कौतुकास्पद कामगिरी कामगिरी कायम राहण्याची चिन्हे आहे.

बुलडाणा आगार अव्वल

दरम्यान ७ आगारात बुलडाणा आगार ५१.१९ लाख नफ्यासह अव्वल ठरला आहे. मेहकर ४८.४६, शेगाव ४५ लाख, चिखली १४.५३, मलकापूर २६.७४, जळगाव जामोद २८.२० लाख नफा असा अन्य आगारांची कामगिरी आहे.

सवलत योजनांतून मिळाले ११ कोटी ७५ लाख

राज्य सरकारने ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षांच्या दरम्यान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत आणि महिला सन्मान योजना अशा तीन योजना जाहीर केल्या आहेत.

या तीन योजनेची अंमलबजावणी केल्याने विभागाला एकूण ११ कोटी ७५ लाख दोन हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. यात अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील) योजनेत ४ कोटी ९१ लाख ५६ हजार ८०० रुपये प्राप्त झाले तर ज्येष्ठ नागरिक (वय ६५ ते ७५ ) यातून ७२ लाख २३ हजार ८८० रूपये आणि महिला सन्मान योजनेतून ५ कोटी ०३ लाख १० हजार ४४० रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले.

Buldana: बुलडाण्याची लालपरी झाली मालामाल! तीन महिन्यात दोन कोटींचा नफा; सवलत योजनांतून मिळाले ११ कोटी ७५ लाख
Nagpur Crime: पती, सासू, सासरे यांनी मारहाण करून विवाहितेची केली हत्या; गळफासाने मृत्यू झाल्याचा केला बनाव

चालक-वाहकांची कमाल

दरम्यान अपुऱ्या संख्येतील बस, जुनाट गाडया, नादुरुस्तीचे प्रमाण, विक्रमी तापमान या अडचणींवर मात करत प्रामुख्याने चालक, वाहक यांनी या कामगिरीत सिंहाचा वाटा उचलला आहे. मे महिन्यात उपलब्ध ४२८ बसद्वारे ४४लाख ९३ हजार किलोमीटर अंतर कापून त्यांनी प्रवासी वाहतूक केली आहे.

यातून २६ कोटी ६३लाख ७९ हजार एवढे उत्पन्न प्राप्त झाले. यातील २४ कोटी ३२लाख ९७ हजार खर्च वजा जाता विभागाला २ कोटी ३ लाखांचा नफा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.