Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

डीजे वाजविण्या बाबत पोलिसांनी कार्यवाहीसाठी कंबर कसली असून सोबतीला आरटीओ बुलढाणा ही दक्ष झाले आहे.
Buldhana Police
Buldhana Policesakal
Updated on

संग्रामपूर (बुलढाणा) : डीजे वाजविण्या बाबत पोलिसांनी कार्यवाहीसाठी कंबर कसली असून सोबतीला आरटीओ बुलढाणा ही दक्ष झाले आहे. 30 मे ला जळगाव जा येथे पहिली कार्यवाही झाल्यानंतर 1 मे ला महाराष्ट्र दिनी जिल्हाभरात कार्यवाही चे हत्यार उपसले आहे.

सध्या लगीनसराई सुरू आहे, लग्न सोहळ्यात अनेकजण डिजे लावताना दिसत आहेत. अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डीजेचे वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एसपी सुनील कडासणे यांनी दिले आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली.

आतापर्यंत २२ डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, ७५ टक्के डिसिमल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा. मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसपी सुनील कडासने म्हणाले.

डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात. त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच वाचणार आहे. समारंभ, सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.