Buldhana Assembly Election 2024 : दिवाळीच्या थंडीत राजकारण तापणार! फटाके कोण फोडणार आणि कुणाला लागणार याचीच सर्वत्र चर्चा

Buldhana VIdhan sabha Election 2024 : बुलडाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत अपेक्षित आहे. उमेदवारी निश्चिती आणि प्रचाराची तयारी सुरू झाली आहे.
Buldhana VIdhan sabha Election 2024
Buldhana VIdhan sabha Election 2024 sakal
Updated on

बुलडाणा : आज उद्या करीत करीत शेवटी विधानसभेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला. आता प्रतीक्षा आहे, प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानाची. या माध्यमातून कोण विजयी फटाके फोडणार? आणि कुणाला फटाके लागणार? या चर्चा आता येते पंधरा दिवस ऐकायला मिळणार आहेत.

गेल्या आठवड्यापासून आचारसंहिता कधी लागते, ही एकच चिंता राजकीय मंडळींना सतावत होती. त्यामुळे जिल्हाभरात विकास पर्व अवतरल्याचा भास होत होता. कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची उद्‍घाटने करण्याचा सपाटा जिल्ह्यातील सातही आमदारांनी लावला होता.

जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. महायुतीचे एखाद दुसरा अपवाद वगळता सर्वच उमेदवार जवळपास निश्चित आहेत, मात्र महाविकास आघाडीचा निर्णय अद्यापही होत नाही. उमेदवारी निश्चित होऊन प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरच वास्तविक परिस्थितीचे आकलन करून कुणाचे पारडे जड राहील हे सांगणे शक्य होणार आहे.

बुलडाण्यात अनिश्चितता

बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय गायकवाड हे निश्चित असले तरी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरत नाही. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये (उबाठा) मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू असून कोणीही थांबण्याचा मनस्थिती नाही.

डॉ. शिंगणेंच्या भूमिकेकडे लक्ष

सिंदखेड राजा मतदारसंघात अजित दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. शिंगणे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी सक्षम पर्याय देखील उपलब्ध दिसत नाही. त्यामुळे डॉ. शिंगणे कोणती भूमिका घेतात, यावर या मतदारसंघातील चित्र अवलंबून राहणार आहे.

चिखलीमध्ये वेगवेगळ्या चर्चा

बुलडाणाप्रमाणे चिखलीमध्येही विद्यमान आमदार श्वेता महाले यांनाच उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची उमेदवारी माजी आमदार राहुल बोंद्रे यांना अपेक्षित आहे. मात्र काँग्रेस धक्का तंत्राचा वापर करून चिखलीतील उमेदवार बदलू शकतो अशा चर्चाही सुरू आहेत किंवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.

मेहकरकडे अनेकांच्या नजरा

मेहकरमध्ये विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर सलग तीन टर्म पासून प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र आता शिवसेनेची दोन शकले झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मतदारसंघावर होतो का? हे पाहावे लागणार आहे. शिवाय शिवसेना उबाठा गट मंत्रालयातील उपसचिव पदावरून सेवानिवृत्ती घेतलेले सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी मतदार स्थानिक असलेल्या डॉ. रायमुलकर यांना पसंती देतो की मूळचे जिल्ह्यातीलच परंतु मुंबईतून आलेल्या सिद्धार्थ खरात यांना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.