Buldhana Rain update: वादळाचा तडाखा; झोळीत झोपलेली ६ महिन्यांची चिमुकली सई २०० फुट पत्र्यासकट उडाली, अन्...

Buldhana rain update: बुलढाण्यात मंगळवारी (ता. ११) सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. १० जून रोजी रात्री सुद्धा जिल्ह्यात एक तास जोरदार पाऊस झाला होता.
Buldhana rain update
Buldhana rain updateEsakal
Updated on

बुलढाण्यात मंगळवारी (ता. ११) सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. १० जून रोजी रात्री सुद्धा जिल्ह्यात एक तास जोरदार पाऊस झाला होता. चिखली तालुक्यासह, सिंदखेडराजा तालुक्यात काल ११ जूनच्या सायंकाळी तुफान वादळ वारा सुटला होता. यावेळी अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली, शेकडो झाडे पडली. दरम्यान चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे याठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे.

वादळाने घरावरील टिनपत्रे उडाले, यावेळी घरामध्ये झोक्यात चिमुकली झोपलेली होती. झोका टिनाखालील लोखंडी अँगललाला बांधलेला होता. वादळाने अँगलसह पत्रे चिमुकलीच्या झोक्यासकट उडून गेले. २०० फूट अंतरावर ते पत्रे आदळली. या घटनेत त्या चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सई असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून ती ६ महिन्यांची होती. देऊळगाव घुबे येथील भरत मधुकर साखरे यांची ती मुलगी होती.

Buldhana rain update
Graduate Constituency Election: विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठी अपडेट! कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची माघार

देऊळगाव घुबे येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. ९.१५च्या आसपास पावसाचा जोर कमी होऊन तुफान वारे वाहू लागले. त्याआधी अर्ध्या तासापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. वाऱ्याचा वेग एवढा होता की सारेच जीव मुठीत धरून आपापल्या घरात बसले होते. जोरदार वाहत असलेल्या वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली.

Buldhana rain update
Alliance with Ajit Pawar: अजित पवारांशी केलेली युती भाजप ब्रँडला धक्का; RSSने मुखपत्रातून सुनावले खडेबोल, म्हणाले 'राज्यात बहुमत असताना...'

दरम्यान, भरत साखरे यांची चिमुकली सई घरात लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती. घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वाऱ्याने घरावरील टिनपत्रे लोखंडी अँगलला बांधलेल्या झोक्यात झोपली होती. घरातील इतर सदस्य जेवायला बसणार तेवढ्यात वाऱ्याने घरावरील टिनपत्रे लोखंडी अँगल आणि बांधलेल्या झोक्यासकट उडून गेली. जमिनीवर पडल्यानंतर तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

Buldhana rain update
Maharashtra Weather Update: राज्याच्या या भागात आज बरसणार मुसळधार; पुढील 15 तास हवामान विभागाकडून हायअलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.