Jalgaon Jamod: दोन महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला व गोळीबार झाल्याची घटना बनावट असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी गोळीबार झाल्याचा खोटा बनाव केल्याचा गुन्हा दाखल करून संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांना अटक केली.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रकाश भिसे यांनी जळगाव पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत नमूद केल्यानुसार भिसे आणि पक्षाचे अन्य एक पदाधिकारी सुनील बोदडे हे दोघे २५ जून रोजी रात्री कारने नांदुऱ्यावरून परत येत होते.
मार्गात खांडवी आणि आसलगावच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या समोरील काचावर रॉडणे हल्ला केला व गोळीबार केला.