दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून

दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून
Updated on

अमरावती : कोरोनामुळे रक्ताची नाती दुरावल्याचे (The corona detached blood relations) चित्र आपण पाहत आहोत. मात्र, मृत्यूनंतरसुद्धा कुटुंबातील सदस्यांच्या अस्थी नेण्यासाठी अनेकांच्या कुटुंबातील नातेवाईक तयार नाहीत (Relatives are not ready to take the bones), हा दुर्दैवी तसेच मनाला चटका लावणारा प्रकार विलासनगर येथील स्मशानभूमीत समोर आला आहे. याठिकाणी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या शहरातील तसेच बाहेरगावच्या जवळपास ६७ ते ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून (By tying bags of bones) ठेवल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. (By tying the remains of 70 dead in the cemetery of Amravati)

शहरातील हिंदू स्मशानभूमीसोबतच विलासनगर येथील स्मशानभूमीत एका महिन्यापासून कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. सामान्यपणे अग्निसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृताच्या कुटुंबीयांकडून अस्थी विसर्जनाची क्रिया करण्यात येते. अमरावतीमध्ये केवळ अमरावती शहरच नव्हे तर नागपूर, वर्धा, यवतमाळ तसेच मध्य प्रदेशातून रुग्ण उपचारासाठी येताहेत. त्यातील अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांचे पार्थिव कुटुंबाला न देता स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात येतात.

दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून
Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

विलासनगर येथील स्मशानभूमीत मागील एका महिन्यात अनेक कोरोना रुग्णांच्या शवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील काही मृत व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, महिना उलटूनही अंत्यसंस्कार झालेल्यांचे नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आलेले नसल्याने स्मशान संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी एका शेडमधील पोत्यांमध्ये त्या अस्थी बांधून ठेवल्या आहेत.

दाम्पत्याच्या अस्थी एकाच पोत्यात

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या बाहेरगावच्या पती-पत्नीचा अंत्यसंस्कारसुद्धा याच स्मशानभूमीत करण्यात आला होता. मात्र, आज एका महिन्यानंतर सुद्धा त्यांचे कुटुंबीय अस्थी घेण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे पती व पत्नीच्या अस्थी एकाच पोत्यामध्ये बांधून ठेवल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून
शाब्बासऽऽ शतकापूर्वी ब्रिटिशांनी उभारलेली वनराई शाबूत
कोविडमुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. स्मशानभूमीमध्ये अनेक जणांच्या अस्थी तशाच पडून आहेत. त्यामध्ये बाहेरगावच्या लोकांचा भरणा अधिक आहे. कुणीच न आल्याने आम्ही त्या अस्थी बांधून ठेवल्या आहेत.
- श्री. भालेराव, केअरटेकर, विलासनगर, स्मशानभूमी

(By tying the remains of 70 dead in the cemetery of Amravati)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()