पदवीधरांच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेचाही स्वबळाचा नारा

candidates will also give a teacher council in the graduate election
candidates will also give a teacher council in the graduate election
Updated on

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्र उमेदवार दिल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार देत भाजपला टक्कर देण्याचे मनसुबे परिषदेने स्पष्ट केले आहेत.
 
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेने भाजपच्या उमेदवाराला मदत करायची व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला साथ द्यायची, असा अलिखित करार झालेला आहे. असे असतानाही भाजपने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार दिल्याने परिषदेने आता अधिकच जोमाने कामाला सुरुवात केली आहे.

शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा प्रत्येक उमेदवाराच्या घोषणापत्रात आहे. परंतु शिक्षक परिषदेच्या उमेदवाराने निवडून आलो तर जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत स्वतःसुद्धा पेन्शन घेणार नसल्याची घोषणा केली आहे. 

दरम्यान, शिक्षकांच्या प्रस्थापित तसेच काही जुन्या संघटनांमध्ये निर्माण झालेल्या दरीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अन्य काही संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे यंदाची लढत काट्याची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
 
 

निश्‍चितपणे देणार उमेदवार 
आमचा उमेदवार कुणाच्या भरवशावर नव्हताच. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद निश्‍चितपणे उमेदवार उभा करणार आहे. 
- राजेंद्र गुजरे, अमरावती विभाग कार्यवाह, 
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद


संपादन : अतुल मांगे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()